Swarndhara Kombdi :कुक्कुटपालनासाठी (Poultry Farming) गिरीराज कोंबडींनंतर स्वर्णधारा कोंबडीला विशेष मागणी असते. स्वर्णधारा कोंबडी ही परसातील कुक्कुटपालनासाठी आणि अर्धबंदिस्त कुक्कुटपालनासाठी उपयुक्त एक जात आहे. ती अंडी आणि मांसासाठी पाळली जाते. ही जात कर्नाटक पशुविज्ञान विद्यापीठाने (Karnataka University of Animal Science) विकसित केली आहे. या कोंबडीची वैशिष्टये जाणून घेऊयात....
Poultry Farming : अंडी आणि मांस दोन्हीसाठी फायदेशीर असलेली गिरीराज कोंबडी, वाचा सविस्तर
स्वर्णधारा (सुधारित जात) - महत्वाची आर्थिक वैशिष्टये
- एक दिवसीय पिलांचे वजन हे 35 ते 40 ग्रॅम असते. शरीराचा रंग हा बहुरंगी असतो.
- लैंगिक परिपक्वता ही 22 ते 23 आठवडे या वयामध्ये येत असते.
- पक्षांचे वजन हे गिरिराजा जातीपेक्षा कमी असते.
- अंड्यांचे वजन हे 55 ते 60 ग्रॅम असते.
- अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे 80 ते 85 टक्के इतके आहे.
- तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक 180 ते 190 अंड्यापर्यंत असते.
- अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो.
- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, इगतपुरी