Join us

Poultry Farming : कोंबड्यांना बसण्यासाठी किती जागा लागते, माहितीय का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:04 IST

Poultry Farming : अगदी लहान पिल्लापासून ते मोठ्या पक्ष्यापर्यंत जागेची गरज लक्षात घ्यावी लागते. या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... 

Poultry Farming : दिवसेंदिवस शेतकरीपोल्ट्री (Poultry Farming) व्यवसायाकडे वळू लागले आहेत. शेतीसोबतचपोल्ट्री व्यवसायातून उत्पन्न मिळवता येते. समजा पोल्ट्री व्यवसाय सुरु करताना अनेक गोष्टीची आवश्यकता भासते. यात जागा हा महत्वाचा मुद्दा ठरतो. अगदी लहान पिल्लापासून ते मोठ्या पक्ष्यापर्यंत जागेची गरज लक्षात घ्यावी लागते. या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... 

आता काही जण मोठमोठे शेड बांधून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) सुरू करतात. तर काहीजण अगदी छोट्या जागेतही पोल्ट्री व्यवसाय सुरू करतात. या दोन्हींचाही विचार केला तर एका कोंबडीसाठी किती जागा लागते? असा प्रश्न उपस्थित होतो. तर आता यामध्ये आपण पक्षाचे वय, बसण्याची जागा, पाण्याची भांडी ठेवण्याची जागा, खाद्याची भांडी ठेवण्याची जागा अशा पद्धतीने लागणाऱ्या जागेचा उहापोह करूयात...

  • तर सुरुवातीला 0 ते 06 आठवडे वय असलेल्या पक्षांसाठी 0.50 चौरस फूट अशी बसण्याची जागा तर 1/4 इंच पाण्याची भांडी ठेवण्याची जागा तर 01 इंच खाद्याची भांडी ठेवण्याची जागा पुरेशी ठरते. 
  • 07 ते 12 आठवडे वय असलेल्या पक्षांसाठी 1.50 चौरस फूट बसण्याची जागा तर 1/2 इंच पाण्याची भांडी ठेवण्याची जागा, 02 इंच खाद्याची भांडी ठेवण्याची जागा. 
  • 12 ते 17 आठवडे वय असलेल्या पक्षांसाठी 1.50 चौरस फूट बसण्याची जागा तर 3/4 इंच पाण्याची भांडी ठेवण्याची जागा आणि 03 इंच खाद्याची भांडी ठेवण्याची जागा. 
  • तसेच 17 आठवड्यांवरील पक्षांसाठी 02 चौरस फूट बसण्याची जागा तर 01 इंच पाण्याची भांडी ठेवण्याची जागा आणि 04 इंच खाद्याची भांडी ठेवण्याची जागा आवश्यक असते. 

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जिल्हा नाशिक

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेतीशेतकरी