Join us

Gram Priya Kombdi : 'या' जातीच्या कोंबडीद्वारे वर्षाकाठी मिळतात 220 अंडी, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:35 IST

Gram Priya Kombdi : कुक्कुटपालन करत असताना कोंबडीच्या जातीची योग्य निवड आवश्यक ठरते.

Poultry Farming : शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून कुक्कुटपालन (Kukkutpalan) व्यवसाय एक चांगली संधी आहे. शेतकरी डीप लिटर आणि केज सिस्टीम मध्ये कोंबड्याचे संगोपन करत असतो.

यासोबतच परसातील कुक्कुटपालनास (Kombadi Palan) चांगला प्रतिसाद मिळू लागला. कुक्कुटपालन करत असताना कोंबडीच्या जातीची योग्य निवड आवश्यक ठरते. आजच्या भागातून ग्रामप्रिया कोंबडीची वैशिष्ट्ये पाहुयात.... 

Poultry Farming : गिरीराज आणि स्वर्णधारा कोंबडीपेक्षा वनराजा कोंबडीपालन फायदेशीर आहे का?

ग्रामप्रिया कोंबडीची वैशिष्ट्ये 

  • वनराजा कोंबडी ही भा.कृ.अ.प. हैद्राबाद, तेलंगाणा प्रकल्प संचालक, पक्षीविभाग यांनी विकसित केली आहे. 
  • एक दिवसीय पिलांचे वजन हे ४५ ते ४८ ग्रॅम असते. शरीराचा रंग हा बहुरंगी असतो. 
  • लैंगिक परिपक्वता ही २२ ते २४ आठवडे या वयामध्ये येत असते. 
  • पक्षांचे वजन हे १.६ ते १.८ किलो असते. अंड्यांचे वजन हे ५२ ते ५८ ग्रॅम असते. 
  • अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे ८४ टक्के इतके आहे. 
  • तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक १९० ते २२० अंड्यापर्यंत असते. 
  • अंड्यांचा रंग हा गर्द तपकिरी असतो. 

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, इगतपुरी

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय