Join us

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसायासाठी आवश्यक गरजा कोणत्या? त्या महत्वाच्या का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 20:19 IST

Poultry Farming : पोल्ट्री शेड बांधायचं (Poultry House) म्हणजे अनेक आवश्यक घटकाचा अंतर्भाव करावा लागतो.

Poultry Farming :  पोल्ट्री शेड बांधायचं (Poultry House) म्हणजे अनेक आवश्यक घटकाचा अंतर्भाव करावा लागतो. सुरवातीला जागा महत्वाची असते. हवेशीर ठिकाणासह हवामान नियंत्रण करणे आवश्यक ठरते. शिवाय पुरेसा प्रकाश, ओलावा नसणारी जागा आदींसह स्वच्छता महत्वाचा घटक आहे. आता या घटकांबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात....  

पोल्ट्री हाउसच्या आवश्यक गरजा 

जागेची गरज : लहान पोल्ट्री हाउससाठी प्रत्येक कोंबडीसाठी जास्त जागा लागते. मोठ्या घरांमध्ये एकंदर उपयोगी जागा अधिक असते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी 15 ते 25 पक्ष्यांचा छोटा गट उत्तम, पण जास्तीत जास्त 250 पर्यंत जाऊ शकतो. व्यावसायिक दृष्टिकोनातून 125 पक्ष्यांच्या युनिट्स चांगल्या ठरतात. लांबट हाउस असल्यास दर 20 फूटावर विभागणी करावी.

हवामान नियंत्रण :कोंबड्यांना 50°F ते 70°F (10°C ते 21°C) तापमान आवश्यक असते. रात्री त्यांना जास्त उबदारपणा लागतो. पेंढा, इतर साहित्य वापरून इन्सुलेशन करणे फायदेशीर ठरते. क्रॉस व्हेंटिलेशनमुळे उन्हाळ्यात घर थंड राहते.

हवेशीर व्यवस्था : कोंबड्यांना इतर प्राण्यांपेक्षा जास्त हवाची गरज असते. एक 2 किलो वजनाची कोंबडी दिवसातून सुमारे 52 लिटर कार्बन डायऑक्साईड तयार करते. त्यामुळे घर पुरेसे उंच असणे आवश्यक आहे जेणेकरून हवा खेळती राहील.

कोरडेपणा : घर कोरडे असणे गरजेचे आहे. ओलसरपणामुळे आजार होतात. ओलसरपणा निर्माण होतो:१) जमिनीखालून येणाऱ्या ओलाव्यामुळे२) गळणाऱ्या भिंती किंवा छतामुळे३) खिडक्यांतून पाऊस/हिम येण्यामुळे४) गळणाऱ्या पाण्याच्या भांड्यामुळे५) पक्ष्यांच्या श्वसनामुळे

प्रकाश : नैसर्गिक प्रकाश कोंबड्यांसाठी आवश्यक आहे. सूर्यप्रकाश रोगजंतू नष्ट करतो, व्हिटॅमिन-D पुरवतो आणि पक्ष्यांना आनंदी ठेवतो. कृत्रिम प्रकाशातही पक्ष्यांचे पालन शक्य आहे.

स्वच्छता : घरात गोचिड, उवा, पिसवा यांचे प्रमाण जास्त असते. हे रोग पसरवतात आणि कोंबड्यांचे उत्पादन कमी करतात. घराची रचना अशी असावी की ती सहज साफ करता येईल. लोहाचा वापर व छतासाठी सिमेंट अस्बेस्टॉस अथवा धातूची पत्रे वापरावीत. लाकूड वापरणार असल्यास त्यावर कोलतार, क्रेसोल सारखे कीटकनाशक लावावे.

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय