Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी (Shrinidhi Kombdi) ही कुक्कुटपालनासाठी (Kukkutpalan) एक चांगली जात आहे, जी परसबागेत किंवा लहान शेतातही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}या कोंबडीच्या जातीत उच्च रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. या कोंबडीची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत? आणि कुक्कुटपालनासाठी (Poultry Farming) किती फायदेशीर आहे, ते पाहुयात....
श्रीनिधी कोंबडीची वैशिष्ट्ये
- श्रीनिधी कोंबडी ही भा.कृ.अ.प. हैद्राबाद, तेलंगाणा प्रकल्प संचालक, पक्षीविभाग यांनी विकसित केली आहे.
- शरीराचा रंग हा बहुरंगी असतो.
- लैंगिक परिपक्वता ही २२ ते २४ आठवडे या वयामध्ये येत असते.
- पक्षांचे वजन हे २.० ते २.५ किलो असते.
- अंड्यांचे वजन हे ५३ ते ५५ ग्रॅम असते.
- अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे ८४ टक्के इतके आहे.
- तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक १५० ते १७० अंड्यापर्यंत असते.
- जगण्याची क्षमता ९५ टक्के असते.
- अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो.
- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव