Join us

Shrinidhi Kombdi : कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 20:07 IST

Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी परसबागेत किंवा लहान शेडमध्येही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी (Shrinidhi Kombdi) ही कुक्कुटपालनासाठी (Kukkutpalan) एक चांगली जात आहे, जी परसबागेत किंवा लहान शेतातही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

या कोंबडीच्या जातीत उच्च रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. या कोंबडीची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत? आणि कुक्कुटपालनासाठी (Poultry Farming) किती फायदेशीर आहे, ते पाहुयात.... 

श्रीनिधी कोंबडीची वैशिष्ट्ये 

  • श्रीनिधी कोंबडी ही भा.कृ.अ.प. हैद्राबाद, तेलंगाणा प्रकल्प संचालक, पक्षीविभाग यांनी विकसित केली आहे. 
  • शरीराचा रंग हा बहुरंगी असतो. 
  • लैंगिक परिपक्वता ही २२ ते २४ आठवडे या वयामध्ये येत असते. 
  • पक्षांचे वजन हे २.० ते २.५ किलो असते. 
  • अंड्यांचे वजन हे ५३ ते ५५ ग्रॅम असते. 
  • अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे ८४ टक्के इतके आहे. 
  • तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक १५० ते १७० अंड्यापर्यंत असते. 
  • जगण्याची क्षमता ९५ टक्के असते. 
  • अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो. 

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव 

टॅग्स :पोल्ट्रीशेतीशेती क्षेत्रदुग्धव्यवसाय