Join us

Poultry Farming : अंडी आणि मांस दोन्हीसाठी फायदेशीर असलेली गिरीराज कोंबडी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 20:51 IST

Poultry Farming : परसातील व्यावसायिक पालनासाठी (Poultry Farming) गिरिराजा या कोंबडीच्या सुधारित जातीविषयी माहिती घेऊयात... 

Poultry Farming :  अलीकडे कोंबडीपालन (Kombadi Palan) व्यवसायाचे प्रमाण वाढू लागले आहे. या व्यवसायात चांगला नफा कमविण्यासाठी अनेक गोष्टींचे नियोजन करणे आवश्यक ठरते. त्यातील महत्वाचा घटक म्हणजे कुक्कुटपक्षांच्या जातीची निवड. आजच्या भागातून परसातील व्यावसायिक पालनासाठी (Poultry Farming) गिरिराजा या कोंबडीच्या सुधारित जातीविषयी माहिती घेऊयात... 

गिरिराज कोंबडी (Giriraj Kombdi) ही भारतातील बेंगळुरू येथील कर्नाटक पशुवैद्यकीय, प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विकसित केलेली कोंबडीची जात आहे. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी चांगली मानली जाते. या कोंबडीची रोगप्रतिकार क्षमता चांगली असते आणि ती विविध वातावरणात वाढू शकते. 

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसायासाठी आवश्यक गरजा कोणत्या? त्या महत्वाच्या का? वाचा सविस्तर

गिरिराजा (सुधारित जात) - महत्वाची आर्थिक वैशिष्टये

  • एक दिवसीय पिलांचे वजन हे 45 ते 46 ग्राम असते. 
  • शरीराचा रंग हा बहुरंगी असतो. 
  • लैंगिक परिपक्वता ही 22 ते 23 आठवडे या वयामध्ये येत असते. 
  • पक्षांचे वजन हे 2.2 ते 2.8 किलो इतकी असते. हे वजन 22 ते 23 आठवड्या च्या वयापर्यंत असते. 
  • अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे 85 ते 87 टक्के इतके आहे. 
  • तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक 150 ते 180 अंड्यापर्यंत असते. अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो.

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायदूध