Poultry Farm : अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात. एका प्रकारच्या खाद्यापेक्षा वेगळे खाद्य देणे, घरगुती आहारात पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्व नसणे किंवा इतर कारणांमुळे ताण येऊन कोंबड्या पुरेसे खाद्य खात नसतील तर ताण येऊ शकतो.
यामध्ये वजन वाढणे, पिसे गळणे किंवा वयात येणे यासारख्या घटना ताण निर्माण करू शकतात. कोंबड्यांना पकडताना, काही औषधे देताना किंवा एका जागेतून दुसरीकडे नेताना कोंबड्यांमध्ये भावनिक ताण येतो. रोग निवारणासाठी देण्यात येणाऱ्या औषधांमुळे व रोगाच्या अवधीमुळेही ताण येऊ शकतो.
उपाययोजना
- कोंबड्यांमधील ताण घालविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रत्येक कोंबडीला किती जागा लागते, हे पाहून आपल्याजवळील उपलब्ध जागेनुसार एकूण कोंबड्यांची संख्या ठरवावी.
- छोट्या जागेत जास्त गर्दी केल्याने वातावरणात अमोनियाचे प्रमाण वाढते.
- शिवाय पक्षी एकमेकांच्या जास्त जवळ असल्याने रोग आल्यास लवकर पसरतो. यावर उपाय म्हणून लिटरची स्वच्छता ठेवावी.
- पावसाळ्यात व जास्त आर्द्रतेच्या काळात लिटर प्रयत्नपूर्वक कोरडे ठेवावे.
- वातावरणातील बदलांनुसार शेडमध्ये पडदे लावणे, पोती बांधणे या गोष्टींची वेळेवर काळजी घ्यावी.
- ताण घालविणारी औषधे तज्ञांच्या सल्ल्याने द्यावीत.
- आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्त्वांचा पुरवठा केल्यास ताण कमी होतो.
- ताण असताना लसीकरण करू नये. प्रथम कोंबड्यांवरील ताण कमी करून मगच लसीकरण करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
English
हिंदी सारांश
Web Title : Chickens Stop Eating? Stress Alert! Poultry Farm Stress Management Tips.
Web Summary : Chickens refusing feed indicates stress, reducing immunity. Overcrowding, ammonia, and disease spread are factors. Manage space, litter, and temperature. Vitamins and expert-recommended medicines help. Delay vaccination during stress. Prioritize stress reduction for healthy poultry.

Web Title : मुर्गियां खाना छोड़ दें तो समझो तनाव! पोल्ट्री फार्म टिप्स।
Web Summary : मुर्गियों का खाना छोड़ना तनाव का संकेत है, जिससे रोग प्रतिरोधक क्षमता कम होती है। भीड़भाड़, अमोनिया और बीमारी फैलना कारण हैं। जगह, कूड़े और तापमान का प्रबंधन करें। विटामिन और विशेषज्ञ की सलाह वाली दवाएं मदद करती हैं। तनाव के दौरान टीकाकरण में देरी करें। स्वस्थ मुर्गी पालन के लिए तनाव कम करना ज़रूरी है।