Join us

PM Matsya Sampada Yojana : मत्स्य संपदा योजनेअंतर्गत महिलांसाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान, काय आहे ही योजना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 20:40 IST

PM Matsya Sampada Yojana : ही योजना केवळ महिलांचे सक्षमीकरण करत नाही तर मत्स्यपालन क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.

PM Matsya Sampada Yojana : मत्स्य संपदा योजना (PM Matsya Sampada Yojana) हा महिलांसाठी एक मोठा उपक्रम आहे. याद्वारे त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी मिळत आहेत. ही योजना केवळ महिलांचे सक्षमीकरण करत नाही तर मत्स्यपालन क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. जवळपास ६० टक्के अनुदान या योजनेतून मिळत आहे. 

प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मत्स्यव्यवसायाशी संबंधित लोकांना, विशेषत: महिला आणि उपेक्षित गटांना सक्षम करणे हा आहे.

या योजनेंतर्गत महिलांना विशेष आर्थिक सहाय्य आणि इतर संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत. जेणेकरून त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारू शकेल. या योजनेमुळे महिला मत्स्यपालन क्षेत्रात उद्योजक बनून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. 

योजनेंतर्गत महिलांना ६० टक्के आर्थिक मदतप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत, महिला लाभार्थ्यांना ६० टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही मदत विविध उपक्रमांसाठी उपलब्ध आहे जसे की : 

  • मत्स्यपालन
  • हॅचरी उत्पादन (माशाच्या अंड्यापासून मासे तयार करणे)
  • समुद्र तण शेती
  • शेलफिश शेती
  • शोभिवंत मत्स्यसंवर्धन 
  • मासे प्रक्रिया आणि विपणन

या उपक्रमांच्या मदतीने महिला मत्स्य उत्पादनापासून ते विक्री आणि प्रक्रियेपर्यंत मत्स्यपालन मूल्य साखळीत सहभागी होऊ शकतात.

महिला लाभार्थी आणि प्रकल्पांची संख्याया योजनेअंतर्गत 2020-21 ते 2024-25 या कालावधीत एकूण 3049.91 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. 56,850 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेषत: तामिळनाडू राज्यात 11,642 महिला लाभार्थी झाल्या आहेत. त्याचवेळी, तामिळनाडूमध्ये मिशन मोडमध्ये समुद्री शैवाल शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. हा उपक्रम लहान मच्छीमारांना, विशेषत: महिला मच्छीमार कुटुंबांना उत्पन्न आणि कल्याणकारी लाभ देत आहे.

महिलांसाठी प्रशिक्षण आणि उद्योजकता विकासPMMSY योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम देखील दिले जात आहेत.राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाने (NFDB) ५ हजार हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.NFDB महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळा आणि स्टार्टअप कार्यक्रम आयोजित करत आहे.विविध संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना व्यवसाय आणि उद्योजकतेमध्ये सक्षम केले जात आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://pmmsy.dof.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला योजनेशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

Winter Fish Farming : हिवाळ्यात मत्स्यपालनासाठी 'या' सात टिप्स नक्की वापरा, जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनामच्छीमार