Nuksan Bharpai : राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली आहे. अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका व जाळी इ. नुकसान झाले आहे. याच बरोबर मत्स्यबीज केंद्र इत्यादीचे नुकसान झाले आहे. अशा नुकसान झालेल्या मत्स्य व्यावसायिकांना विशेष मदत पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपरोक्त दराप्रमाणे मदत देण्याकरीता पुढीलप्रमाणे कार्यपध्दती / अटीशर्ती विहित करण्यात येत आहेत.प्रत्येक तलावाचे जलक्षेत्र, इष्टतम मत्स्यबीज संचयन, अपेक्षित मत्स्योत्पादन याचा विचार करुन त्यानुसार मत्स्यबीज वाहून गेल्याची आकडेवारी व मत्स्यसाठा वाहून गेल्याची आकडेवारी निश्चित करावी.
(या शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्यसाठा वाहून गेल्याने नुकसान भरपाईस पात्र असणाऱ्या अथवा नुकसान भरपाई प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना, तलाव ठेका धोरण दि.०३/०७/२०१९ अन्वये अतिवृष्टीमुळे तलाव ठेक्यास मिळणारी मुदत वाढ अनुज्ञेय असणार नाही.)
- मत्स्यसाठ्याबाबतची आकडेवारी निश्चित करतांना मागील वर्षी तलावाच्या पाण्याची पातळी, तलाव कोरडा असल्यामुळे पाण्याची पातळी, अतिवृष्टी / अवर्षण मुदतवाढ देण्यात आली असल्यास याचा आढावा घेण्यात यावा.
- अतिवृष्टीमुळे तलावाचा वाहता सांडवा, सांडव्याची उंची, वाहत्या सांडव्याचा कालावधी याचा आढावा घेण्यात यावा.
- अतिवृष्टीमुळे जलाशयाचे गेट उघडण्यात आले असल्यास व गेटची उंची व गेट उघडण्यात आल्याचा कालावधी .
- तलावात संस्था /ठेकेदार यांनी मत्स्यबीज संचयन केल्याचे पंचनामे तपासण्यात यावे. तसेच मत्स्यबीज खरेदीच्या पावत्याची सुध्दा खातरजमा करण्यात यावी.
- बोटी खरेदीबाबत वस्तू व सेवा कर (GST) पावत्या तपासून खातरजमा करावी.
- जाळी खरेदीच्या वस्तू व सेवा कर (GST) पावत्या तपासून खातरजमा करावी.
- तलावातून मागील वर्षी अपेक्षित मत्स्योत्पादनापैकी प्रत्यक्षात घेतलेले मत्स्योत्पादन, मासेमारीचा मासिक अहवालाची तपासणी करण्यात यावी.
- लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वाटप करण्याकरीता जिल्हा कार्यालय स्तरावर लाभार्थी निहाय नुकसानीची विवरणपत्र तयार करण्यात येऊन त्यावर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रतिस्वाक्षरी करुन नंतर अनुदान वाटप करावे.
- लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचे वाटप थेट लाभार्थीच्या बँक खात्यात डी.बी.टी द्वारे अदा करण्यात यावे.
पंचनामा करतेवेळी वरील नमूद बाबींसाठी पंचनामा करताना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, तलाठी / पोलीस पाटील, सरपंच, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचा अध्यक्ष / सचिव अशा अधिकाऱ्यांच्या उपस्थिती करण्यात यावा.
जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे.अतिवृष्टीमुळे राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या नुकसानीबाबत पंचनामा करुन खरेदी पावत्या इत्यादी समाविष्ठ करुन प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी संबंधीत जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना एकत्रित प्रस्ताव सादर करावा.
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनाराष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषाच्या मर्यादेत देण्यात येणारे अर्थसहाय्य राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष शिथिल करुन देण्यात येणारे अतिरिक्त अर्थसहाय्य राज्य आपत्ती निवारण निधीमधून भागविण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी करतील.लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई बाबत आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी वेळोवेळी आढावा घेवून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.
Web Summary : Fishermen in Maharashtra affected by heavy rains and floods will receive special compensation for losses to fish stock, seeds, boats, and equipment. The compensation will be disbursed via DBT after verification of losses.
Web Summary : महाराष्ट्र में भारी बारिश और बाढ़ से प्रभावित मछुआरों को मछली स्टॉक, बीज, नावों और उपकरणों के नुकसान के लिए विशेष मुआवजा मिलेगा। नुकसान के सत्यापन के बाद मुआवजा डीबीटी के माध्यम से वितरित किया जाएगा।