Join us

Fish Farming : मत्स्यपालन सुरु करताय? या माशांच्या तीन जाती आहेत बेस्ट पर्याय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:26 IST

Fish Farming Breeds : भारतात मत्स्यशेतीला मोठा वाव असून अलीकडे असंख्य शेतकरी मत्स्य शेतीकडे वळू लागले आहेत.

Fish Farming Breeds : मत्स्यशेती (Fish Farming) म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय. ही माशांची पैदास कशी होते, त्याचा अभ्यास करून, त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. भारतात मत्स्यशेतीला (Fish Breeds) मोठा वाव असून अलीकडे असंख्य शेतकरी मत्स्य शेतीकडे (Matsya Sheti) वळू लागले आहेत. मत्स्य शेती सुरु करताना कोणत्या जातींची निवड करावी? हे जाणून घेऊयात... 

कटला, रोहू, मृगळ या तीन प्रमुख जातींना भारतीय प्रमुख कार्प (Indian Carp) असे संबोधण्यात येते. जलद वाढणाऱ्या उपरोक्त तीनही जाती खाद्यासाठी एकमेकांत स्पर्धा न करणाऱ्या तसेच पाण्यातील तीन वेगवेगळ्या थरातील उपलब्ध नैसर्गिक अन्न (प्राणी प्लवंग वनस्पती प्लवंग) व पुरक खाद्य खावून वाढणाऱ्या मत्स्यभक्षक नसलेल्या व बाजारात चांगला भाव मिळणाऱ्या आहेत. तसेच उपरोक्त माशांचे बीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होवू शकते. 

कटला (Catla)

  • कटला माशाचे डोके मोठे व रुंद असते.
  • शरीराचा मध्य भाग रुंद व फुगीर असतो.
  • तोंड वरच्या बाजूला वळलेले असते.
  • खालचा भाग जाड असतो. मिशा नसतात.
  • पाण्याच्या वरच्या स्तरात वास्तव्य व फक्त तेथील अन्न खातो. त्यामुळे इतरांच्या अन्नाशी स्पर्धा करीत नाहीत. मिश्रशेतीसाठी उपयुक्त.
  • प्रमुख खादय प्राणी प्लवंग व वनस्पती प्लवंग आहेत.
  • सर्वात जास्त वेगाने वाढणारा कार्प मासा. तिस-या वर्षात प्रजननक्षम होतो.
  • जलद वाढीने व आकर्षक दिसण्यात बाजारात चांगली किंमत
  • शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी अतिशय उपयुक्त मासा.

 

रोहू (Labeo rohita)

  • शरीर लांब व प्रमाणबद्ध असते.
  • खालचा ओढ जाड असतो. त्याची किनार मऊ व दातेरी असते.
  • वरच्या जबड्यात दोन लहान मिशाा असतात.
  • तोंड किंचीत खालच्या बाजूला वळलेले असते. खवले लाल रंगाचे असतात.
  • वास्तव्य पाण्याच्या मध्यस्तरात व तेथीलच अन्न खातो. 
  • वाढ वार्षिक ७०० ते ८०० ग्रॅम, मिश्र शेतीसाठी उपयुक्त.
  • आहारात वनस्पती प्लवंग व सडलेलया वनस्पतीवरील जीवजंतू,
  • दुसऱ्या वर्षात प्रजननक्षम होतो. बंगाली लोकांचा आवडता मासा.
  • शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी अतिशय उपयुक्त मासा.

 

मृगळ (Cirrhinus mrigala)

  • माशांचे शरीर जास्त लांबट असते.
  • तोंड स्वतःच्या बाजूला वळलेले रुंद असते.
  • ओठ पातळ व खालच्या जबडयावर दोन मिशा असतात.
  • वास्तव्य तलावाच्या तळाजवळ असते. व तळयातील कुजणारे वनस्पतीजन्य अन्न, शेवाळ व प्राणी प्लवंग
  • वार्षिक वाढ ६०० ते ७५० ग्रॅम मिश्र शेतीसाठी उपयुक्त
  • दुस-या वर्षी प्रजननक्षम होतो, शेततळ्यात गाळ/माती कमी असलयास अपेक्षेत वाढ मिळत नाही.

 

- सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक

टॅग्स :मच्छीमारशेती क्षेत्रकृषी योजना