Join us

वाढत्या चाऱ्याच्या भावाने शेतकरीवर्ग धास्तावला, कुठल्या चाऱ्याला भाव किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:51 AM

पाणीटंचाईसह चाराही उपलब्ध होत नसल्याने मिळातोय तो चारा जादा भावाने विकत घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ..

यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अगदीच कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून, या दुष्काळजन्य स्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. चाराच उपलब्ध नसल्याने व मिळणारा चारा जादा भावाने विकत घेण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्ग चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपली जनावरे पडेल त्या भावाने विकण्याच्या मनःस्थितीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करतात; तर दुसरीकडे चाराच मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सध्या जनावरांच्या खाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यात दग्नाचा संपूर्ण बस्ता एकाच ठिकाणी दुष्काळीस्थिती असल्यामुळे पशुपालक जादा दराने चारा खरेदी करीत आहेत. अनेक शेतकरी पाण्याची परिस्थिती पाहूनच आपला ऊस,कडवळ, मका व अन्य पिके जनावरांच्या चाऱ्यासाठी विकत घेत आहेत. उसाचा ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत टनाचा भाव आहे.

ओला मका २ हजार रुपये गुंठा व ओल्या कडब्याला गुंठ्याला दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे महागाईचे खाद्य घालून शेतकऱ्यांना नाइलाजाने कवडीमोल दराने दूध विक्री करावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळेच अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यात पशुधन वाचवणे शेतकऱ्यासाठी अवघड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १२ लाख ६१ हजार ९३३ इतके पशुधन आहे. त्यामध्ये गायवर्ग ५ लाख ९२ हजार ३५२, म्हॅसवर्ग १ लाख २ हजार ९६५, शेळी ४ लाख ७० हजार २०५, मेंढीवर्ग ९६ हजार ४११ इतके मोठे पशुधन असूनही दुष्काळामुळे व चाऱ्याच्या कमतरतेमुळे आर्थिक तोटा सहन करून पशुधन वाचविणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

पशुखाद्याचे दर

सरकी पेंड १३०० ते १४०० (प्रति ४० किलो)गोळी पेंड  १६०० ते १७०० प्रति ५० किलोमका आटा  ११०० ते १२०० प्रति ५० किलोशेंग पेंड  २५०० ते २८०० प्रति ४५ किलोगहू आटा  १३५० ते १४०० प्रति ४५ किलोओला ऊस ४५०० रुपये टनओला मका २००० रुपये प्रति गुंठाओली कडवळ १७००ते १८०० प्रतिगुंठावाळका कडबा २००० ते २२०० शेकडा

 

 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीपाणी टंचाईदूधव्यवसाय