Join us

Sheli Palan : शेळीपालनात करडांचा, शेळ्यांचा व बोकडांचा आहार कसा असावा.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:52 IST

यशस्वी शेळीपालनाच्या पंचससुत्रात करडांचा, शेळ्यांचा व बोकडांचा आहार हे महत्वाचे सुत्र आहे. तो कसा द्यावा ते पाहूया.

शेळ्यांमध्ये पायाभूत चयापचयाचा दर इतर प्रजातीपेक्षा जास्त आहे म्हणून त्यांना मेंढ्या आणि गायींपेक्षा उच्च पातळीचे पोषण आहार आवश्यक आहे. शेळ्यांमध्ये पोषक तत्वांची दूध उत्पादनासाठी रूपांतर करण्याची कार्यक्षमता ४५ ते ७१ टक्क्यांपर्यंत आहे.

निसर्गतः शेळ्यांमध्ये झाडपाल्यातील टॅनीन नावाचा विषारी घटक पचविण्याची क्षमता आहे. मात्र या झाडपाल्यांचा योग्य प्रमाणात शेळ्यांच्या आहारात वापर करणे जरुरीचे आहे.

यशस्वी शेळीपालनाच्या पंचससुत्रात करडांचा, शेळ्यांचा व बोकडांचा आहार हे महत्वाचे सुत्र आहे. तो कसा द्यावा ते पाहूया.

करडांचा आहार• करडांना जन्मल्याबरोबर आईचा चिक वजनाचे १० टक्के, आर्ध्या तासाचे आत पाजावा म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढते.• दूध तीन महिने वयापर्यंत पाजावे.• पहिल्या पंधरवाड्यानंतर थोडे पशुखाद्य व वाळलेला चारा चघळण्याची सवय लागु द्यावी.• खाद्याचे प्रमाण वयानुसार खालील प्रमाणे वाढवीत जावे१) एक ते दोन महीने ५० ते १०० ग्रॅम खाद्य२) दोन ते तीन महिने १०० ते १५० ग्रॅम खाद्य३) तीन ते चार महीने २०० ते २५० ग्रॅम खाद्य४) चार महिन्यानंतर ३५० ते ५०० ग्रॅम खाद्य

माद्यांचा आहार• चराऊ पध्दतीत ६ ते ८ तास चारणे गरजेचे असते.• बंदिस्त शेळीपालनात एका शेळीला ४ किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा द्यावा.• चाराऊ कुरणात चाऱ्याचा तुटवडा असल्यास १ किलो हिरवा चारा व ५०० ग्रॅम वाळलेला चारा रात्रीचे वेळी पुरवावा.• ३५० ग्रॅम पशुखाद्य रोज द्यावे.• पैदास हंगामात ५०० ग्रॅम पर्यंत खाद्य वाढवावे म्हणजे जुळ्यांचे प्रमाण वाढते.• विण्यापुर्वी दोन महिने खाद्य व आहार उत्तम ठेवावे म्हणजे वजनदार करडु जन्माला येईल व शेळीला दूध चांगले फुटेल तसेच करडु जोमाने वाढेल.• नियमीत डहाळा करावा. लिंब, बाभुळ, बोर, अंजन यांचा जास्त वापर करावा कारण शेळ्या आपली ६० ते ७० टक्के भुक द्विदलचारा व झाडपाल्यावर भागवते.

नरांचा आहार• नरांना रोज ३५० ते ४०० ग्रॅम पशुखाद्य द्यावे.• पैदास हंगामात प्रथीनयुक्त चारा, शेंगदाणा पेंड, क्षार मिश्रण द्यावे.• पैदास क्षमता वाढवण्यासाठी मोड आलेली मटकी द्यावी.

पाणी व्यवस्थापन१) शेळ्यांना दिवसातुन किमान एकदा तरी पाणी पाजावे.२) साधारणपणे रोज २ ते ३ लिटर पाणी वातावरणानुसार पाजावे.३) थंड हवामानात शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व कोमट पाण्याचा पुरवठा करावा.

अधिक वाचा: Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय

टॅग्स :शेळीपालनशेतकरीशेतीव्यवसायपीक