Join us

दूध अनुदानाची मुदत एक महिन्यांनी वाढवल्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा! पण शासननिर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 5:59 PM

महसूलमंत्री तथा पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्र्यांनी सभेत बोलताना घोषणा केली असून शासननिर्णय अजून घेतलेला नाही.

संगमनेर : दुधाचे भाव पडल्यानंतर २७ रुपये दर निश्चित केला आहे. अधिक पाच रुपये अनुदान आपण देत आहोत. या अनुदानाची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती. ही मुदत आणखी एक महिना वाढविली आहे. आता दोन महिने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असे महसूलमंत्री, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

बुधवारी (दि. २१) मंत्री विखे-पाटील संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मालपाणी लॉन्स येथे राष्ट्रीय वयोश्री योजना, राष्ट्रीय दिव्यांग योजना या माध्यमातून लाभार्थीना साहित्यांचे वितरण करण्यात आले. १ हजार ८०० ज्येष्ठ नागरिक आणि ५६३ दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या साहित्याचे वितरण केले. तसेच जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील २९ शाळांना मंजूर झालेल्या डिजिटल बोडर्डाचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सदाशिव लोखंडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ-पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, डॉ. अशोक इथापे, रमेश काळे, सोमनाथ कानकाटे आदी उपस्थित होते. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या ४४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २७ कोटी ४४ लाख रुपये जमा झाले असून, हे जनतेच्या मनातील सरकार आहे त्यामुळेच जनतेच्या हिताचे निर्णय होत असल्याचे विखे-पाटील म्हणाले.

चर्चेनंतर उपोषण मागेम्हाळुंगी नदीच्या पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर मंत्री विखे- पाटील यांच्याशी आमची चर्चा झाली, त्यांना आम्ही मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले असून, हा पूल दर्जेदार आणि टिकाऊ होणार आहे. तसेच वेळेच्या आत पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे साखळी उपोषण स्थगित केले आहे. मुख्य पुलाचे आणि पर्यायी पुलाचे काम दर्जेदार होण्यासाठी त्याकडे समितीचे कायम लक्ष राहील. -किरण पाटणकर, म्हाळुंगी पूल बनाव कृती समिती

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदूधदुग्धव्यवसाय