Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही आहेत टॉप फाईव्ह चाऱ्याची पिके, जनावरांच्या सुदृढ आरोग्य, दूध वाढीसाठी बेस्ट पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:20 IST

Best Fodder Crops :  जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात वाढीसाठी पौष्टिक हिरवा चारा अत्यंत आवश्यक आहे.

Best Fodder Crops :  जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात वाढीसाठी पौष्टिक हिरवा चारा अत्यंत आवश्यक आहे. मका, ज्वारी, बाजरी (एकदल) आणि लसूणघास, चवळी (द्विदल) यांसारखी पिके उत्तम आहेत. 

जनावरांसाठी चाऱ्याची पिके

  • जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, मका व बाजरीची फेब्रुवारी मध्ये पेरणी करावी.
  • पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी चारा पिकाची लागवड करावी.
  • जनावराना सकाळच्या थंडीपासून बचाव व संरक्षण करावे व गोठा कोरडा ठेवावा. 
  • गोठा कोरडा राहील, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यासाठी दर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा. 
  • जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड/ सरकी पेंड यांचा वापर वाढवावा. 
  • शक्य असल्यास बायपास फॅट आणि प्रथिनयुक्त आहार यांचा वापर वाढवावा. 
  • क्षार व जीवनसत्त्वांचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा. 
  • चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे, जेणेकरून गवतावर दहिवर नसेल. 
  • गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत. 
  • जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी  

English
हिंदी सारांश
Web Title : Top 5 Fodder Crops for Healthy Livestock and Milk Production

Web Summary : For healthy livestock and increased milk, nutrient-rich green fodder is crucial. Plant sorghum, maize, and millet in February. Provide bypass fat, protein, minerals, and vitamins. Protect livestock from cold, keep sheds dry, and avoid grazing in snail-infested areas. Give green fodder in the morning and dry fodder at night.
टॅग्स :शेती क्षेत्रचारा घोटाळाशेतीदुग्धव्यवसाय