Join us

Sheli-Mendhi Gotha : शेळ्या अन् मेंढ्यासाठी गोठा कसा तयार करावा? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:02 IST

Sheli-Mendhi Gotha : शेळ्यांचा गोठा हा देखील महत्वाचा घटक असतो. त्यामुळे शेळ्या- मेंढ्यांचा गोठा कसा असावा, हे जाणून घेऊयात... 

Sheli-Mendhi Gotha : शेळी पालन (Goat Farming) हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळ्यांना इतर जनवरांपेक्षा कमी प्रमाणात खाद्य लागते. शेळ्यांना निरोगी राहण्यासाठी पाणी, ऊर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे या पोषक तत्वांची आवश्यकता असते. याचसोबत शेळ्यांचा गोठा हा देखील महत्वाचा घटक असतो. त्यामुळे शेळ्या- मेंढ्यांचा गोठा कसा असावा, हे जाणून घेऊयात... 

शेळ्या, मेंढयांचा गोठा

  • गोठ्याची रचना ही इंग्रजी 'A' अक्षराप्रमाणे असावी, शेळ्या-मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. 
  • गोठे पोठ्या उंचावर बांधणे आवश्यक असते, गोठे कोरडे, हवेशीर आणि सुयोग्य असावेत.
  • हिवाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होते. 
  • गोठ्याची दिशा ठरवताना पूर्व-पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सार्यकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. 
  • उपलब्ध होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते.
  • गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा, गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो आणि जमिनीचे तापमान कमी होण्यास प्रतिबंध करता येतो.
  • गोठ्याच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूंना जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी
  • वयोमानाप्रमाणे शेल्या, बोकड आणि करडांची वेगवेगळी व्यवस्था करावी.
  • दिवसा गोठ्याची खिडक्या, दारे खुली ठेवावीत. जेणेकरून हवा खेळती राहील. 
  • रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे, जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
  • शेळ्या-मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. 
  • जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या-मेंढ्या तेथे जाऊन बसतील. त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल
  • शेळ्या, मेंढ्यांना आणि करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून उब मिळेल.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय