Join us

शेळी- बोकड नाविन्यपूर्ण योजनेची निवड सुरू, 'ही' कागदपत्र करा अपलोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:55 IST

Goat Scheme : नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत दुधाळ प्राण्यांचे वाटप (दुधाळ देशी गाय, म्हैस, किंवा संकरीत गायी) करण्यात येते.

Agriculture News : नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गाई, म्हशी व शेळ्या बोकड योजने (Sheli Bokad Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. संबंधित शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कागदपत्र अपलोड (Documents Upload) करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

पशुसंवर्धन विभागाकडून (Animal Husbandry Department) नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत दुधाळ प्राण्यांचे वाटप (दुधाळ देशी गाय, म्हैस, किंवा संकरीत गायी) करण्यात येते. राज्यातील शेती आणि पशुसंवर्धनाला चालना देणे, असा उद्देश या योजनेचा आहे. 

आता या योजनेत सहभागी झालेल्या म्हणजे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मॅसेजद्वारे कळविण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना मेसेज प्राप्त झाले आहेत, त्यांनी त्वरित कागदपत्र अपलोड करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

संबंधित https://ah.mahabms.com/ संकेतस्थळावर जाऊन कागदपत्र अपलोड करता येणार आहे. 

कागदपत्रांची यादी 

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. ८ अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) ( असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
टॅग्स :शेळीपालनकृषी योजनाशेती