नाशिक :मान्सूनपूर्व लसीकरण (Pre monsoon Vaccination) आवश्यक आहे, कारण पावसाळ्यात जनावरांना अनेक साथीचे रोग होतात. लसीकरणामुळे घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, पीपीआर यांसारख्या रोगांपासून संरक्षण मिळते. या लसीकरणामुळे (Lasikaran) जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि त्यांचे उत्पादनदेखील वाढते.
जनावरांना वर्षातून दोनदा, विशेषतः पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर, जंतनाशक औषध देणे फायद्याचे ठरते. जंत आणि परजीवी कमी करण्यासाठी मदत करते, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी शिंदे यांनी दिली.
पोटात कुठले जंत आढळतात?जनावरांच्या पोटात राउंडवॉर्म, हुकवॉर्म, व्हिपवॉर्म आणि थ्रेडवॉर्म हे जंत होतात. हे जंत जनावरांच्या राहतात किंवा आतड्यांमध्ये आणि ते अन्न शोषून घेतात. आतड्यांच्या भिंतीला नुकसान करतात.
जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता अबाधित राखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जनावरांना जंतनाशक औषधे द्यावीत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील २ हजार ३९७ गावांमध्ये पशुगणना नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये २०१९ च्या पशुगणनेत जिल्ह्यात १९ लाख ३९ हजार ५६४ इतक्या गुरांची नोंदणी झाली होती.
तर २०२५ च्या पशुगणनेत १८ लाख २४ हजार ६२ इतक्या गुरांची नोंदणी झाली. एक लाख १५ हजार गुरे कमी झाली आहेत. पशुपालनाकडे तरुण वर्गाची पाठ व आजारांमुळे जनावरांचा मृत्यू यामुळे जनावरांची संख्या घटली का? याचे कारण शोधले जात आहे. जनावरांना लस देण्यासाठी पशू वैद्यकीय विभागाने आवाहन केले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला आवश्यकजंतनाशक औषध देताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जंतनाशकाचा प्रकार, योग्य मात्रा, आणि ते कधी द्यावे, याबद्दल पशुवैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे जनावरांना योग्य उपचार मिळतो.
२०१९ ला इतके होते पशू२०१२ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये ११ लाखांवर गायी, म्हशी, शेळी व मेंढ्या, ८ लाख २३ हजार २५, तसेच १३ लाख १५ हजार ७०० कोंबड्या होत्या. कोंबड्या सोडून इतर सर्वच पशू सहा टक्क्यांनी आताच्या पशुगणनेत कमी झाले आहेत. जिल्ह्याच्या पशुगणनेत सहा टक्के पशू कमी झाले असले, तरी पोल्ट्री फार्म वाढल्याने २०१९ च्या तुलनेने दीड पट संख्या कोंबड्यांची वाढलेली असल्याचे पशू विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.