नागपूर : जिल्ह्यातील पशुधनाच्या आरोग्य सेवांना आता मोठे बळ मिळणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Pashu Sanavardhan)
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये पशुसंवर्धन विभागाचे श्रेणीवर्धन केल्यामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांतील मनुष्यबळाची कमतरता, अपुरी उपकरणे आणि औषधसाठ्याचा अभाव यांसारख्या समस्या दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Pashu Sanavardhan)
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आतापर्यंत पशुधनाची देखभाल केली जात होती. मात्र, आता विभागाची पुनर्रचना करण्यात आल्याने जिल्हा परिषद व राज्य पशुसंवर्धन यंत्रणा एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे शासनाचा निधी, जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी अशा विविध स्त्रोतांमधून मोठा आर्थिक पाठबळ या विभागाला मिळणार आहे.(Pashu Sanavardhan)
पशुपालक शेतकऱ्यांना होणार थेट लाभ
पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.
यात दुध उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन
जनावरांवरील आजारांचे नियंत्रण
लसीकरण मोहिम
प्रशिक्षण कार्यक्रम
आधुनिक संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यांचा समावेश आहे.
या सेवांमुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
रुग्णालयांची श्रेणीवाढ
पूर्वी जिल्ह्यात श्रेणी १ व श्रेणी २ अशी पशुवैद्यकीय रुग्णालये होती. पुनर्रचनेनंतर श्रेणी २ च्या रुग्णालयांना श्रेणी १ चा दर्जा देण्यात आला आहे.
सध्या एक पशुवैद्यकीय रुग्णालय ८ ते १० गावांतील पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहे.
मनुष्यबळाची भरती लवकरच
जिल्ह्यातील १६० पशुवैद्यकीय रुग्णालयांसाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
जिल्हास्तरावर वर्ग ३ मधील दोन पदे भरली जाणार
जिल्ह्यात पाच फिरते पशुचिकित्सालय कार्यरत
पशु आरोग्यासाठी १९६२ हेल्पलाईन उपलब्ध
सध्या विभागात ४० ते ४५ टक्के पदे रिक्त असून ही तूट भरून काढण्यावर भर दिला जात आहे.
पायाभूत सुविधांनाही चालना
विभाग बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत:
आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी यंत्रसामग्री मंजूर
ज्या ठिकाणी शौचालय नाही तेथे बांधकाम
जीर्ण दवाखान्यांच्या इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी
प्रत्येक गावात पशुंसाठी सुरक्षित कठडे उभारण्याच्या सूचना
जिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणा
श्रेणी १ चे १६० पशुवैद्यकीय रुग्णालय
तालुका स्तरावर १२ पशुचिकित्सालय
जिल्हा स्तरावर स्वतंत्र जिल्हा पशुचिकित्सालय
यामुळे जिल्ह्यात पशुसंवर्धनासाठी भक्कम आरोग्य सेवा यंत्रणा उभी राहत आहे.
जिल्ह्यातील पशुसंवर्धन सेवा अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे आरोग्य सुधारण्यासाठी ही पुनर्रचना महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती डॉ. नितीन फुके यांनी दिली.
विभागाची पुनर्रचना केल्यामुळे यंत्रणा बळकट होणार आहे. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दवाखान्यासाठी यंत्रसामग्री सेस फंडातून मंजूर केली आहे. प्रत्येक गावात पशूसाठी कठडा लावण्याच्या सूचना केल्या आहे.- डॉ. नितीन फुके, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.
Web Summary : Maharashtra is upgrading veterinary hospitals, addressing staff shortages and equipment issues. Animal husbandry gets a boost with combined funding, benefiting farmers through improved healthcare, vaccination drives, and modern research access. Infrastructure improvements are also planned.
Web Summary : महाराष्ट्र में पशु चिकित्सालयों का स्तर बढ़ाया जा रहा है, जिससे कर्मचारियों की कमी और उपकरणों की समस्या का समाधान होगा। संयुक्त निधि से पशुपालन को बढ़ावा मिलेगा, जिससे बेहतर स्वास्थ्य सेवा, टीकाकरण और आधुनिक अनुसंधान पहुंच के माध्यम से किसानों को लाभ होगा। बुनियादी ढांचे में सुधार की भी योजना है।