Join us

परभणी कृषी विद्यापीठातर्फ़े म्हैस आणि वगार यांचा जाहीर लिलाव, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:36 IST

Agriculture News : परभणी अ.भा.स.एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्प यांच्या माध्यमातून म्हैस आणि वगार यांचा जाहिर लिलाव ठेवण्यात आलं आहे. 

Agriculture News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अ.भा.स.एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्प यांच्या माध्यमातून म्हैस आणि वगार यांचा जाहिर लिलाव ठेवण्यात आलं आहे. 

या लिलावाचे स्थळ अ.भा.स.एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयच्या पुर्वेला, उती संवर्धन प्रकल्पा जवळ वनामकृवि, परभणी या ठिकाणी जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नियम व अटी :

  • १) लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीने नेमून दिलेल्या स्थळी वेळेवर उपस्थित रहावे लागेल
  • २) लिलावापूर्वी अनामत रक्कम ३ हजार ( तीन हजार केवळ) भरुन लिलावात भाग घेता येईल आणि ती रक्कम संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच परत मिळेल.
  • ३) लिलावात जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला लिलाव सोडल्या जाईल आणि त्याच दिवशी जनावर घेवून जावे लागेल. अन्यथा त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.
  • ४) लिलाव सुटलेल्या व्यक्तीस अंतीम बोली प्रमाणे संपूर्ण रोख रक्कम त्याच वेळेस तात्काळ भरावी लागेल. रोख रक्कम अदा न केल्यास सदरील व्यक्तीची अनामत रक्कम जप्त केली जाईल.
  • ५) संपूर्ण रोख रक्कम भरुनच जनावर संबधीताने स्वखर्चाने न्यावे लागेल. रोख रक्कम लिलाव पूर्ण झाल्यावर तात्काळ न भरल्यास नंबर दोन च्या व्यक्तीला लिलाव सोडल्या जाईल.
  • ६) जनावरांची अपेक्षे प्रमाणे किंमत न आल्यास अशा जनावरांचा लिलाव रद्द करणे अथवा फेर लिलाव घेणे या संबंधीचे सर्व अधिकार हे लिलाव समितीने राखून ठेवलेले आहेत.
  • ७) लिलावात भाग घेणाऱ्या सदस्यांनी समितीने ऐनवेळी केलेल्या सुचनांचे/अटींचे पालन करणे बंधनकारक राहील.

दिनांक : ८ ऑगस्ट २०२५, वेळ : सकाळी ११:३० वाजतासंपर्क: 9588648242, 7588082051

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायदूध