Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mandhal Bail Bajar : मांढळच्या बैलबाजारात कोट्यवधींची उलाढाल; पाहा काय आहेत भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:59 IST

Mandhal Bail Bajar : शेतीचा हंगाम आला की बळीराजाची लगबग सुरू होते, पण सध्या चर्चा आहे ती नागपूर जिल्ह्यातील मांढळच्या बैलबाजाराची. इथे चक्क एका बैलजोडीची किंमत दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. फक्त स्थानिकच नाही तर जिल्ह्याबाहेरून आलेले व्यापारी आणि शेकडो जोड्यांमुळे या बाजाराने कोट्यवधींचा आकडा पार केलाय. नेमकं काय आहे या बाजाराचं वैशिष्ट्य? वाचा सविस्तर (Mandhal Bail Bajar)

Mandhal Bail Bajar : विदर्भातील शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला आहे. शेतीच्या कामांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या बैलांची खरेदी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मांढळ येथील प्रसिद्ध आठवडी बैलबाजारात शेतकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.(Mandhal Bail Bajar)

यावर्षी बाजारात बैलांची आवक मोठी असून खरेदी-विक्रीचे व्यवहार तेजीत असल्याने बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. यामुळे बाजारपेठेत मोठे चैतन्य पसरले आहे.(Mandhal Bail Bajar)

शेकडो बैलजोड्या दाखल; ५० हजारांपासून भाव सुरू

मांढळचा बैलबाजार हा परिसरातील सर्वात मोठा आणि जुना बाजार मानला जातो. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतजमीन तयार करण्याच्या कामासाठी बैलांची मागणी वाढली आहे.

या आठवडी बाजारात परिसरातील गावांतून तसेच दूरवरून शेतकरी आपली धष्टपुष्ट आणि देखणी जनावरे विक्रीसाठी घेऊन आले आहेत. बाजारात सध्या ५० हजार रुपयांपासून ते थेट दीड लाख रुपयांपर्यंत बैलजोड्यांचे भाव गायले जात आहेत.

साधारण बैलजोडी: ५० हजार ते ८० हजार रुपये

उत्कृष्ट व कामाला भारी जोडी : १ लाख ते १.५ लाख रुपयांच्या घरात.

जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांची गर्दी

या बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, येथे सुमारे १२ ते १३ अनुभवी दलाल (मध्यस्थ) सक्रिय आहेत. खरेदीदार शेतकरी आणि विक्रेते यांच्यात योग्य समन्वय साधून, बैलांची पारख करून योग्य भावात व्यवहार पूर्ण करण्यात हे दलाल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

केवळ स्थानिक शेतकरीच नाही, तर नागपूर जिल्ह्याबाहेरील व्यापारी आणि शेतकऱ्यांनीही बैलांच्या खरेदीसाठी मांढळात मोठी गर्दी केली आहे.

हंगामाच्या तोंडावर बैलांची अत्यंत गरज असते, त्यामुळे बाजारात चांगली गर्दी आहे. शेतकरी आपापल्या बजेटनुसार बैलांची निवड करत आहेत.- दिगंबर सेलोकर, स्थानिक शेतकरी, मांढळ

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून चोख व्यवस्था

कडक उन्हाळा आणि बाजारातील गर्दी लक्षात घेता, खरेदी-विक्रीसाठी आलेल्या शेतकरी आणि जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने (APMC) चोख व्यवस्था केली आहे.

पिण्याचे पाणी: जनावरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करण्यात आली आहे.

सावलीची सोय: उन्हाचा तडाखा पाहता जनावरांना उभे राहण्यासाठी काही ठिकाणी 'नेट'द्वारे सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक नियोजन: बाजारात जनावरांची ने-आण करणाऱ्या वाहनांचा प्रवेश आणि निर्गमन सुलभ व्हावे यासाठी बाजार समितीचे कर्मचारी तैनात असून ते वाहतुकीचे चोख नियोजन करत आहेत.

खरीप हंगाम तोंडावर असताना मांढळच्या बैलबाजारातील या तेजीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर :Summer Animal Care: वाढत्या उष्माचा पशुधनाला धोका; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

अधिक वाचा : Mango Farming Tips : अवकाळी पावसानंतर आंबा बाग वाचवायची? 'या' उपायांनी टळेल मोठं नुकसान!

English
हिंदी सारांश
Web Title : Mandhal Cattle Market Thrives: Crores Transacted, High Prices Reported

Web Summary : Mandhal's cattle market sees huge turnover as farmers prepare for Kharif season. Bull prices range from ₹50,000 to ₹1.5 lakh per pair. APMC ensures water, shade. Rural economy boosted.
टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीशेतकरीशेतीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती