Join us

Lumpy Skin Disease Prevention: लम्पीवर मात! अंबड तालुक्यात ५३ हजार पशुधन सुरक्षित वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:57 IST

Lumpy Skin Disease Prevention : अंबड तालुक्यात लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव रोखण्यात पशुवैद्यकीय विभागाला मोठे यश आले आहे. २७ एप्रिल ते १५ मेदरम्यान राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल ५३ हजार २०० गुरांना लस देण्यात आली, ज्यामुळे तालुक्यात आजाराचा प्रसार पूर्णतः थांबला आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले. (Lumpy Skin Disease Prevention)

अशोक डोरले 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात लम्पी स्किन डिसीज या गुरांमध्ये वेगाने पसरत जाणाऱ्या विषाणूजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यात पशुवैद्यकीय विभागाला मोठे यश आले आहे. (Lumpy Skin Disease Prevention)

२७ एप्रिल ते १५ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल ५३ हजार २०० गुरांना लस देण्यात आली असून, यामुळे आजाराचा प्रसार रोखला गेला आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले. (Lumpy Skin Disease Prevention)

लम्पी स्किन डिसीज धोकादायक; पण टाळता येणारा आजार

लम्पी हा डास, माशा, गोचीड यांसारख्या बाह्य परजीवींमार्फत पसरत जाणारा विषाणूजन्य आजार आहे.

काय आहेत लक्षणे 

ताप (१०५–१०६°F)

संपूर्ण शरीरावर कडक गाठी (२–५ सेंमी)

डोके, मान, पाय, कास, तोंड व घशात फोड

लाळ गळणे, सूज, हालचालींमध्ये अडथळा

भूक मंदावणे, वजन घटणे, अशक्तपणा

गाभण जनावरांमध्ये गर्भपात

आठवडी बाजारावर परिणाम नाही

लसीकरणामुळे तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्याची वेळ आली नाही. लसीकरण न झालेल्या काही गुरांमध्ये लक्षणे आढळली, मात्र उपचारांमुळे ती लवकर बरी झाली.

व्यापक लसीकरण मोहिम

तालुक्यातील १८ पशुवैद्यकीय दवाखाने (जिल्हा परिषद – ९, राज्य शासन – ९) यांच्या समन्वयातून गावागावात लसीकरण कॅम्प घेण्यात आले आहेत.

एकूण ५३ हजार २०० गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

पूर्वमोसमी टप्प्यातच लसीकरणाची मोहिम यशस्वी

अधिकारी काय सांगतात

लसीकरणामुळे तालुक्यात लम्पीचा प्रसार रोखण्यात यश आले असून, पशुधनाचे मोठे नुकसान टळले आहे. - डॉ. मारोती कुन्हाडे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती अंबड

पशुपालकांना लम्पी आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी वेळोवेळी मार्गदर्शन गरजेचे आहे.- गणेश पोखरकर, पशुपालक, मठ जळगाव

अंबड तालुक्यातील पशुधन संख्या (२१वी जनगणना)

गाय वर्ग: ७३,५२९

म्हैस वर्ग: १३,१७९

शेळी व मेढ्या: ६४,०६३ 

एकूण: १,५०,७७१

हे ही वाचा सविस्तर : Animal Market : पशु बाजारचा उतरता आलेख; कारण आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रप्राण्यांवरील अत्याचारप्राणीजालनाशेतकरीशेती