Livestock Market : निजाम काळापासून प्रसिद्ध असलेल्या उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील जनावरांच्या बाजारात सध्या पशुधनाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. (Livestock Market)
यावर्षी समाधानकारक पावसामुळे चारा व पाण्याचा प्रश्न बराचसा मिटल्याने शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारपेठ पशुधनाने बहरलेली दिसत असली, तरी खरेदीदारांची संख्या घटल्याने व्यवहार मात्र काहीसे संथ असल्याचे चित्र आहे. (Livestock Market)
विजयादशमीपासून खऱ्या अर्थाने सुरू होणाऱ्या या बाजारात दर आठवड्याला शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस मोठी वर्दळ असते. याठिकाणी प्रामुख्याने देवणी, लाल कंधारी आणि गावरान जातीच्या देखण्या बैलजोड्या तसेच दुधाळ जनावरांची मोठी आवक पाहायला मिळते. (Livestock Market)
सध्या बाजारात सामान्य बैलजोडीची किंमत १ लाख ते १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे, तर उत्कृष्ट, मजबूत आणि जोडीला साजेशी बैलजोडी २ लाख रुपयांपर्यंत विक्रीसाठी सांगितली जात आहे. दुधाळ गायी व म्हशींचे दर ६० ते ८० हजार रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (Livestock Market)
यंदा पावसाने साथ दिली असली, तरी परराज्यातील ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे व्यापारी सांगत आहेत. पूर्वी कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच तेलंगणातून मोठ्या संख्येने खरेदीदार हंडरगुळीच्या बाजारात दाखल होत असत.
मात्र सध्या वाहतूक खर्च, वाढती महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे परराज्यातील व्यापारी कमी प्रमाणात येत आहेत. याचा थेट परिणाम बाजारातील उलाढालीवर होत असल्याचे चित्र आहे.
खरेदीदारांची संख्या कमी असल्याने बाजारात दलालांचा सुळसुळाट वाढल्याचे पशुपालकांकडून सांगण्यात येत आहे. दलालांकडून भाव पाडण्याचे प्रकार वाढले असून, अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक पशुपालकांना आपली जनावरे न विकताच परत न्यावी लागत आहेत.
वाढती महागाई, चारा, औषधे आणि देखभाल खर्च यामुळे जनावरे सांभाळणे आता अधिकच कठीण होत चालले आहे.
सध्याच्या काळात पशुधन सांभाळणे अत्यंत खर्चिक झाले आहे. मात्र आमच्या कुटुंबात पशुधनाची जोपासना ही परंपरा आहे. त्यामुळे अडचणी असूनही आम्ही आजही जनावरे जपत आहोत.-ज्ञानोबा केंद्रे, पशुपालक
एकीकडे चांगल्या प्रतीच्या बैलजोड्यांना लाखमोलाचे भाव मिळत असले, तरी दुसरीकडे खरेदीदारांची कमतरता आणि दलालांचा वाढता हस्तक्षेप यामुळे हंडरगुळीच्या या प्रसिद्ध बाजारातील संमिश्र स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
Web Summary : Despite good rains and ample livestock, the Hunderguli market faces dwindling buyers. Interstate traders are scarce due to costs and uncertainty, impacting sales and increasing reliance on local brokers, leaving farmers struggling with prices.
Web Summary : अच्छी बारिश और पर्याप्त पशुधन के बावजूद, हुंडरगुली बाजार में खरीदार कम हो रहे हैं। लागत और अनिश्चितता के कारण अंतरराज्यीय व्यापारी कम हैं, जिससे बिक्री प्रभावित हो रही है और स्थानीय दलालों पर निर्भरता बढ़ रही है, किसान कीमतों से जूझ रहे हैं।