Join us

'या' बाजारात शेळी-बोकडाला चांगला भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 21:37 IST

Sheli Bokad Market : मागील आठवडाभरात शेळी मेंढी बोकड आणि म्हशीचे बाजारभाव कसे राहिले? हे पाहुयात..

Sheli Bokad Market :  शेळी  बोकडाचे बाजार भाव (Sheli Bokad Market) देखील तेजीत असून मागील आठवडाभरात शेळी मेंढी बोकड आणि म्हशीचे बाजारभाव कसे राहिले? हे आजच्या भागातून पाहुयात...12 जून रोजी खामगाव बाजारात तीन बोकडांची आवक झाली. यावेळी कमीत कमी 05 हजार रुपये तर सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळाला. 

तसेच बकऱ्याचे बाजार भाव (Goat Market) पाहिले असता 10 जून रोजी भिवंडी बाजारात 2370 दाखल झाले. यावेळी प्रति नग कमीत कमी 3500 तर सरासरी 4500 हजार रुपये, 12 जून रोजी खामगाव बाजारात कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 07 हजार रुपये, दर्यापूर बाजारात कमीत कमी 03 हजार 500 रुपये तर सरासरी चार हजार 250 रुपये दर मिळाला. 

तर मेंढ्यांचा बाजार पाहिला तर खामगाव बाजारात 12 जून रोजी पाच नग दाखल झाले. प्रति नग सरासरी सहा हजार रुपयांचा दर मिळाला. तर म्हशीचे बाजारभाव पाहिले असता 12 जून रोजी खामगाव बाजारात कमीत कमी वीस हजार रुपये तर सरासरी 38 हजार रुपये दर मिळाला. 

13 जून रोजी कल्याण बाजारात लोकल जातीच्या म्हशीला कमी कमी 75 हजार रुपये तर सरासरी 80 हजार रुपये मिळाला. तर हायब्रीड म्हशीला कमीत कमी 85 हजार रुपये तर सरासरी एक लाख रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर 14 जून रोजी भूर बाजारात नंबर एकच्या म्हशीला कमीत कमी 20 हजार रुपये तर सरासरी 40 हजार रुपयांचा दर मिळाला.

टॅग्स :शेळीपालनमार्केट यार्डशेती क्षेत्र