Join us

Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना दिवसाला पाणी किती लागते? ते कधी द्यावे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:19 IST

Goat Farming : उन्हाळ्यात तापमान (temperature) वाढल्यास, शेळ्यांना जास्त पाणी पिण्याची गरज भासते.

Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना दररोज ५ ते ७ लिटर पाणी 9Goat water Management) लागते, हे त्यांच्या वजनानुसार आणि तापमानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात तापमान (temperature) वाढल्यास, शेळ्यांना जास्त पाणी पिण्याची गरज भासते. तसेच, दूध देणाऱ्या शेळ्यांना अधिक पाण्याची आवश्यकता असते, कारण दुधामध्ये 84 ते 88 टक्के पाणी असते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. 

उन्हाळ्यात शेळ्यांचे पाणी व्यवस्थापन 

  • सर्वसाधारणत शेळ्यांना पिण्याकरिता दररोज ५ ते ७ लिटर पाणी लागते. परंतु उन्हाळ्यात त्यांना १५ ते २० लिटर पाणी लागते. 
  • किंवा प्रति एक किलो शुष्क चाऱ्यामागे ४ लिटर पाणी देणे आवश्यक आहे. 
  • बंदिस्त शेळीपालनात पिण्याचे मुबलक स्वच्छ ताजे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे. 
  • पिण्याच्या पाण्याचे तापमान २० ते २४ अंश सेल्सिअस असावे. 
  • शेळ्यांना स्वच्छ, थंड पाणी प्यायला उपलब्ध करून द्यावे. 
  • पाणी भरलेले पाणीदार किंवा बादल्यांमध्ये ठेवावे, जेणेकरून त्यांना सहज पाणी पिता येईल. 
  • उन्हाळ्यात शेळ्यांना पिण्यासाठी माठ किंवा रांजणातील पाणी दिल्यास ते पाणी शेळ्या आवडीने पितात.
  • शेळ्यांना पुरेसे पाणी देणे आवश्यक आहे, कारण पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्यांना अशक्तपणा, हगवणी आणि इतर समस्या येऊ शकतात. 
  • शेळ्यांना बुळकांडी रोगप्रतिबंधक लस या महिन्यात (एप्रिलमध्ये) टोचुन घ्यावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Poultry Farming : पोल्ट्री शेड उभारणीसाठी जागा निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

टॅग्स :शेळीपालनशेतीदुग्धव्यवसायदूधतापमान