Goat Farming : शेळी पालन (Sheli Palan) तीन पद्धतीने केले जाते. त्यातील एक पद्धत म्हणजे मिश्र किंवा अर्ध बंदिस्त शेळी पालन पद्धत होय. अर्ध बंदिस्त किंवा मिश्र व्यवस्थापन पध्दतीमध्ये मर्यादित स्वरुपात मुक्त आणि बंदिस्त पध्दतीचा समावेश केला जातो. परंतु, मुळ ठिकाणापासून शेळ्यांचे कळपाचे स्थलांतर केले जात नाही. शेळ्या एकाच ठिकाणी ठेऊन त्यांचे संगोपन केले जाते. जाऊन घेऊया या पद्धतीबद्दल....
अर्ध बंदिस्त किंवा मिश्र व्यवस्थापन पद्धत
- शेळ्या मित्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान ५० पेक्षा अधिक नसते.
- शेळ्यांचे कळप, नैसर्मिक कुरण, शेतातील बांधावर, धान्य पिकाची काढणी केलेल्या क्षेत्रावर तसेच झाड पाल्यावर दैनंदिन ६ ते ८ तास चारल्या जातात.
- परंतु, फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही.
- त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटणाची गोठ्यात सोय केली जाते.
- गाभण दुभत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करडांची विशेष काळजी घेतली जाते.
मिश्र व्यवस्थापन पध्दतीचे फायदे
- शेळ्यांची आहार क्षमता, पचनक्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते.
- गाभण, दुभत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करडांची विशेष काळजी घेणे सोईचे होते.
- शरिराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दुध उत्पादन वाढण्यास मदत होते.
- तसेच लेंडीखताचे उत्पादन सुध्दा आधिक मिळते
- आहारातील अन्नद्रव्याचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर मिश्र व्यवस्थापन पध्दतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पध्दतीपेक्षा निश्चितच चांगला होतो.
- तसेच स्वस्त मांस उत्पादनामाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर उपयोग करुन घेण्यासाठी ही पध्दत चांगली तसेच सोईस्कर आहे.
मिश्र व्यवस्थापन पध्दतीचे तोटे नैसर्गिक कुरण तसेच चारण्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास जातीवंत अधिक उत्पादन देणाऱ्या संकरीत शेळ्या अशा भागात जोपासण्यासाठी ही सोईस्कर होऊ शकत नाही.
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक