Join us

Goat Farming Guide : शेळ्यांसाठी नैसर्गिक रेतन पद्धत फायद्याची की तोटयाची? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 20:27 IST

Goat Farming Guide : नैसर्गिक पद्धत नेमकी काय आहे? ती कशी वापरली जाते? या लेखातुन समजून घेऊयात... 

Goat Farming Guide :  साधारण नैसर्गिक आणि कृत्रिम रेतन (Natural insemination) अशा दोन पद्धती वापरल्या जातात. यात नैसर्गिक रेतन पद्धत म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या गर्भधारणा केली जाते. शेळ्यांमध्ये नैसर्गिक रेतन पद्धत वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही पद्धत नेमकी काय आहे? ती कशी वापरली जाते? या लेखातुन समजून घेऊयात... 

नैसर्गिक रेतन पद्धत 

  • शेळीचा माज संपताना तीला बोकड दाखवावा. 
  • शेळी सकाळी माजावर आल्यास त्याच दिवशी संध्याकाळी आणि जर शेळी संध्याकाळी माजावर आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी बोकड दाखविला असता ती गाभण राहण्याची शक्यता जास्त असते. 
  • त्यानंतर १२ तासांनी जर शेळी माजावर असेल तर पुन्हा बोकड दाखवावा. 
  • पैदाशीच्या वेळी शेळी आणि बोकड दोघांचाही आहार संतूलित असणे आवश्यक आहे. 
  • चांगला बोकड एका दिवसात २ शेळ्यांना व एका आठवड्यात ४-५ शेळ्यांना गर्भार ठेवू शकतो.

 

नैसर्गिक रेतन पध्दती कमी खर्चाची आहे. शिवाय या पध्दतीत तोटे आहेत ते कोणते? 

  • यामध्ये विर्याची तपासणी होत नाही, यामुळे पैदाशीस अयोग्य बोकडही वापरले जाऊन त्यावेळी माजावर असलेल्या शेळ्या वारंवार उलटण्याची शक्यता असते.
  • नैसर्गिक पध्दतीत पुनरुत्पादन संस्थेचे बोकडाचे रोग शेळीला व शेळीचे रोग बोकडाला होण्याची शक्यता असते.
  • या पध्दतीत चांगल्या बोकडाकडून एका वेळी एकच शेळी भरवली जाते. 
  • त्यामुळे मौल्यवान व चांगल्या बोकडाच्या विर्याचा पुरेपूर वापर होत नाही.

 

डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेतीशेती क्षेत्रदुग्धव्यवसाय