Join us

Goat Farming : 'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:10 IST

Goat Farming : देशात शेळीपालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आठ राज्ये आहेत, जिथे शेळीपालन वेगाने वाढत आहे. 

Goat Farming : देशात गेल्या काही वर्षात शेळीपालनात मोठी वाढ झाली आहे. केवळ दुधासाठीच नव्हे तर मांसासाठीही शेळ्यांची मागणी वाढत आहे. शिवाय आखाती देशांमध्ये, जिवंत शेळ्या देखील पुरवल्या जात आहेत. म्हणूनच देशात शेळीपालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आठ राज्ये आहेत, जिथे शेळीपालन वेगाने वाढत आहे. 

राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम) मधील आकडेवारीवरून नुसार देशातील शेळीपालन वाढते आहे. या योजनेअंतर्गत पशुपालनासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते. एनएलएम ही केंद्र सरकारची योजना आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक कर्ज अर्ज शेळीपालनासाठी आहेत. शेळीपालनासाठी अर्जांची संख्याही दक्षिण भारतातील राज्यांमधून लक्षणीय आहे.

या ८ राज्यांमध्ये पशुधनासहित शेळीपालन वेगाने वाढत आहे.

कर्नाटक -एकूण अर्जांची संख्या - १०४०शेळीपालनासाठी - ९५६

मध्य प्रदेश -एकूण अर्जांची संख्या - ४१५शेळीपालनासाठी - ३४१

तेलंगणा -एकूण अर्जांची संख्या - ४५७शेळीपालनासाठी - ४०९

महाराष्ट्र -एकूण अर्जांची संख्या - ३१५शेळीपालनासाठी - २४०

आंध्र प्रदेश-एकूण अर्जांची संख्या- २४३शेळीपालनासाठी- २१५

राजस्थान-एकूण अर्जांची संख्या- १२५शेळीपालनासाठी- ११९

तामिळनाडू-एकूण अर्जांची संख्या- १४२शेळीपालनासाठी- १३१

उत्तर प्रदेश-एकूण अर्जांची संख्या- १४५शेळीपालनासाठी- ११६

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, एनएलएम अंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातून अर्ज येतात. विशेषतः, पशुपालन आणि चारा क्षेत्रातील विशिष्ट कामांसाठी अर्ज प्राप्त होतात. प्रत्येक राज्यातून प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची संख्या विचारात घेतली तर, सर्वाधिक अर्ज शेळीपालनाशी संबंधित आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Goat farming booms in 8 states; demand surges nationwide.

Web Summary : Goat farming is rapidly expanding in India, driven by rising demand for both milk and meat. Eight states, including Karnataka and Maharashtra, are witnessing significant growth, supported by government schemes offering loans and subsidies for goat rearing.
टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायदूध