Join us

शेळीला झालेली जखम भरून काढण्यासाठी 'हा' परफेक्ट उपाय करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:55 IST

Goat Farming : अनेकदा पावसाळ्यात शेळ्यांना जखमा होतात, त्या भरून काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी...

Goat Farming :  शेळ्यांना पावसाळ्याअगोदर व पावसाळ्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, घटसर्प व पीपीआर या रोगांच्या प्रतिबंधक लसी देऊन घेणे आवश्यक आहे. याच बरोबर आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते समजून घेऊयात..... 

शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

 

  • मे व सप्टेंबर महिन्यात शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशकाची योग्य मात्रा देऊन जंत निर्मूलन करून घ्यावे. 
  • ढगाळ व दमट हवामान जंतांच्या वाढीसाठी पोषक असते.
  • शेळ्यांना लस कधीही रोग आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट रोगाच्या साथीमध्ये रोग झालेल्या शेळीला लस दिल्यास तो रोग बरा न होता बळावतो.
  • पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्या बसून त्या चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • माश्यांचा आवश्यक तो बंदोबस्त करावा. 
  • यासाठी कडुनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून शेडचे निर्जंतुकीकरण करावे.
  • पावसाळ्यात शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात. 
  • यासाठी अशा शेळ्यांना वाळलेल्या जागेत ठेवून त्या जखमी पोटॅशियम परमँगनेटने धुऊन त्यावर मलमपट्टी करावी.
  • पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा. 
  • तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरल्यास शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होईल.
  • पावसाळ्यात नवीन शेळ्या शक्यतो विकत घेऊ नये. घेतल्यास कमीत कमी २१ दिवस त्या शेळ्यांना काहीही रोग नाही, यांची खात्री केल्याशिवाय त्यांना मुख्य कळपात मिसळू नये.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायदूधशेळीपालन