Join us

Goat Sheep Care : ऑगस्टमध्ये शेळ्या-मेंढयांना 'हे' लसीकरण करा, अनेक आजार टाळता येतील! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:40 IST

Goat Sheep Care : योग्य वेळी लसीकरण केल्यास, अनेक रोग टाळता येतात आणि त्यांचे आरोग्य सुधारते.

Goat Sheep Care : शेळ्या-मेंढ्यांसाठी (Goat Sheep Care) लसीकरण महत्वाचे आहे. योग्य वेळी लसीकरण केल्यास, अनेक रोग टाळता येतात आणि त्यांचे आरोग्य सुधारते. ऑगस्ट महिन्यात देखील विशेष काळजी घ्यावी लागते. या महिन्यात कोणते लसीकरण करणे आवश्यक असते, ते समजून घेऊयात...

सर्वसाधारण पशुधनासाठी 

  • पावसाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या टाक्यामध्ये पावसाचे वाहत आलेले पाणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
  • पाण्याच्या हौदांची नियमित स्वच्छता करून चुना लावून घ्यावे.
  • गायी म्हशी नुकत्याच प्रसव झाल्या असल्यास नवजात वासरांची विशेष दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. 
  • संपूर्ण पावसाळ्यात स्तनदाहाचे प्रमाण वाढते. त्यासाठी दुध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर जीवाणूनाशक द्रावणाची कासेवर फवारणी करावी किंवा सडे द्रावणात बुडवावीत.

 

ऑगस्टमधील शेळ्यांतील व्यवस्थापन

  • शरीरावरील परजीवींच्या वाढीकडे लक्ष द्यावे.
  • नवीन करडांचे जंतनिर्मूलन करावे.
  • सर्व शेळ्यांचे आंत्रविषार, पी.पी.आर., धनुर्वातसाठी लसीकरण करून घ्यावे.
  • पैदासक्षम शेळ्यांना खुराक वाढवा.
  • पैदाशीच्या बोकडांची पैदाशीसाठी तयारी करावी. 
  • जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर माज ओळखण्यासाठी 'माज ओळखणारा बोकड' (Teaser Buck) गोठ्यात ठेवावा.

 

ऑगस्टमधील मेंढ्यांचे व्यवस्थापन

  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कळपातील मेंढ्यांची लाल लघवीचा आजार व कावीळ या रोगाची तपासणी करून उपचार करावे.
  • मेंढ्यांना शिफारशीनुसार जंताचे औषध उपचार करावेत.
  • गाभण मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी.
  • ९ ते १२ महिने वयाच्या कोकरांचे शारीरिक वजन घ्यावे.
  • सर्व मेंढ्यांना धनुर्वात रोगाचे लसीकरण करून घ्यावे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय