Agriculture News : पशुसंवर्धन विभागामार्फत (Department of Animal Husbandry) विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात. यात शेळीपालन, दुधाळ जनावरे (गाई-म्हशी) वाटप, कुक्कुटपालन, तसेच पशुधन व्यवस्थापनासाठी अनुदान यांचा समावेश आहे. या योजेनसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट समोर आले आहे.
या योजनेतून ऑनलाइन अर्जांमधून निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना महाडीबीटीकडून आवश्यक कागदपत्रे https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी SMS द्वारे सूचना देण्यात आली होती.
दरम्यान कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या. या अडचणी किंवा त्रुटी पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना मॅसेज पाठवण्यात आले आहेत. अशा SMS आलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता १ जुलै २०२५ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत करावी, अशी सूचना देण्यात आलेली आहे.
असे आहे वेळापत्रक लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्ततेसाठी एक जुलैपासून ०३ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर कागदपत्रांची अंतिम पडताळणी ०४ जुलै ते ०६ जुलै या दरम्यान होणार आहे. तर ०७ जुलै हा राखीव दिवस असून अंतिम लाभार्थी पात्रता यादी ती ०७ जुलै रोजी तयार होणार आहे. दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे.