Join us

Animals Vaccination : लाळ-खुरकूतवर बंदोबस्त; 'या' जिल्ह्यात जनावरांना लसीकरण मोहिमेची सुरुवात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:34 IST

Animals Vaccination : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोहीम आजपासून सुरू झाली आहे. 'लाळ-खुरकूत' या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ३ लाख ७५ हजारांहून अधिक गाय-म्हैसवर्गीय पशुधनाचे १४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या कालावधीत लसीकरण करण्यात येणार आहे. (Animals Vaccination)

Animals Vaccination : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोहीम आजपासून सुरू झाली आहे. 'लाळ-खुरकूत' या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ३ लाख ७५ हजारांहून अधिक गाय-म्हैसवर्गीय पशुधनाचे १४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या कालावधीत लसीकरण करण्यात येणार आहे. (Animals Vaccination)

जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या पशुधनाचे लसीकरण प्राधान्याने करून घ्या आणि आजाराचा धोका टाळा.(Animals Vaccination)

धाराशिव जिल्हा पशुसंवर्धन विभागाने आजपासून 'लाळ-खुरकूत' प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार असून, एकूण ३ लाख ७५ हजार गाय-म्हैसवर्गीय जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.(Animals Vaccination)

लाळ-खुरकूत म्हणजे काय?

हा विषाणूजन्य आजार प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि डुक्कर यांच्यात आढळतो. संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला १०२ ते १०६°F पर्यंत ताप येतो, त्यानंतर तोंड, जिभ, हिरड्या आणि खुरांमध्ये फोड होतात. 

फोड फुटल्यानंतर जखमा होऊन जनावरे चारा-पाणी घेणे बंद करतात. तोंडातून लांब, चिकट लाळ गळणे ही लक्षणे ठळकपणे दिसतात. 

उपचारात विलंब झाल्यास जनावरांची लंगडीपणा आणि अशक्तपणा वाढतो.

आजाराचा प्रसार कसा होतो?

प्रत्यक्ष संपर्क: आजारी जनावरांच्या जवळ राहिल्याने निरोगी जनावरांना संसर्ग.

अप्रत्यक्ष संपर्क: दूषित चारा, पाणी, हवा किंवा जनावरांचे शेण, लघवी.

माणसांद्वारे: गोठ्यातील मजूर किंवा पशुवैद्य यांच्या कपड्यांद्वारे विषाणूंचा प्रसार.

प्रतिबंधक उपाययोजना

दर ६ महिन्यांनी लाळ-खुरकूत प्रतिबंधक लस देणे.

गोठा व जनावरांची स्वच्छता राखणे.

आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे.

लस मात्रा उपलब्धता

पशुसंवर्धन विभागाकडे सध्या १ लाख ३७ हजार ५०० लस मात्रा शिल्लक आहेत. उर्वरित प्रमाणासाठी अतिरिक्त मात्रा मागविण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे, जेणेकरून आजाराचा प्रसार थांबवता येईल, असे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. कमलाकर साळुंके यांनी सांगितले.

हे ही वाचा सविस्तर : Lumpy Skin Disease Prevention: लम्पीवर मात! अंबड तालुक्यात ५३ हजार पशुधन सुरक्षित वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीप्राण्यांवरील अत्याचारधाराशिवशेतकरीशेती