Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bail Bajar : गुरांच्या बाजारात बैलजोडी, गाई- म्हशींची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:19 IST

Bail Bajar : पूर्व विदर्भातील भंडारा शहरात गुरांचा बाजार (Gurancha Bajar) वैनगंगा नदीकाठावर दर रविवारला भरतो.

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा शहरात गुरांचा बाजार (Gurancha Bajar) वैनगंगा नदीकाठावर दर रविवारला भरतो. कानाकोपऱ्यातून आलेल्या गुरांच्या (Bail Bajar) खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. जनावरांची घटलेली संख्या, चाराटंचाई व अन्य कारणांमुळे जनावरांच्या किमती ५ ते १० हजारांनी वधारल्याचे यावेळी दिसून आले.

रंगरूप, बांधा, दुधाच्या क्षमतेनुसार गुरांचे दरसध्या १० ते १५ लीटर दूध देणाऱ्या म्हशींची किमत ८० हजार ते १ लाख २० हजारांच्या घरात दिसून आल्या. बैलजोडीची किमत ६० हजार ते १ लाख १० हजारापर्यंत. दूध देणाऱ्या संकरित व गावठी गायींचे दर ४० ते ६० हजार रुपये. वासरांचे दर २० ते ३० हजार रुपये.

पशुखाद्य महागले, जनावरांचे भाव चढलेजिल्ह्यातील पशुपालक पशुचारा म्हणून तणस, हरभरा, गहू, मूग, पोपट आदींचा वापर करतात. परंतु, सध्या हरभरा, गहू आदी भुशाचे दर वधारले आहेत. वर्षभरापूर्वी १० हजार रुपयात डालंभर मिळणारा भुसा आता १५ हजार रुपयांवर विकला जातो, तर एक ट्रॅक्टर तणसाचे दर ७ ते १० हजारांपर्यंत आहेत. दुधाळ जनावरांचे पशुखाद्यही महागले आहेत.

इतर बाजारातील भाव अजनगाव सुर्जी बैल बाजारात नगाला कमीत कमी 10 हजार रुपये ते सरासरी 20 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. लाखनी बाजारात स्थानिक जनावरांना कमीत कमी 06 हजार 750 रुपये तर सरासरी दहा हजार 875 रुपये दर मिळाला. तसेच जुन्नर- बेल्हे बाजारात लोकल बैलांना नगामागे कमीत कमी 10 हजार रुपये, तर सरासरी 25 हजार रुपये तर भोर बाजारात नंबर एकच्या बैलांना नगामागे कमीत कमी 15 हजार रुपये तर सरासरी 35 हजार रुपये इतका दर मिळतो आहे.

चारा टंचाई व महागलेला चारा यामुळे उन्हाळ्यात गुरांचे भाव वधारतात. यंदाही गुरांचे दर ५ ते १० हजार रुपयांची वाढले आहेत. तसेच अलीकडे शेतीकामासाठी आधुनिक यंत्राचा वापर होतो. त्यामुळे बैल विक्री वाढलेली दिसून येते. - रमेश बांते, पशुपालक, निलज बुज.

Buffalo Farming : ऊन वाढलंय! लाखोंचं नुकसान टाळण्यासाठी म्हशींची अशी घ्या काळजी

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीभंडारा