Join us

Animal Care Tips : जनावरांची प्रतिकारशक्ती कमी; लसीकरण आणि स्वच्छता हाच उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:26 IST

Animal Care Tips : पावसाळ्याचा परिणाम आता गुरांच्या तब्येतीवर दिसत आहे. दमट वातावरण, गोठ्यातील ओलावा आणि डास-माशांचा प्रादुर्भाव यामुळे गुरांना घटसर्प, सरा, चौखुरा व बॅबेसिओसिससारख्या रोगांचा धोका वाढतो आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी लसीकरण, गोठ्याची स्वच्छता आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन आहे. (Animal Care Tips)

Animal Care Tips : पावसाळ्याचा परिणाम आता गुरांच्या तब्येतीवर दिसत आहे. दमट वातावरण, गोठ्यातील ओलावा आणि डास-माशांचा प्रादुर्भाव यामुळे गुरांना घटसर्प, सरा, चौखुरा व बॅबेसिओसिससारख्या रोगांचा धोका वाढतो आहे. (Animal Care Tips)

अशा परिस्थितीत पशुपालकांनी लसीकरण, गोठ्याची स्वच्छता आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन आहे.(Animal Care Tips)

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे पशुधनावर आजारांचा धोका वाढतो आहे. गुरांच्या गोठ्यांतील ओलावा, साचलेले पाणी व बदलते हवामान यामुळे गाई, म्हशी, शेळ्या व इतर जनावरांना संसर्गजन्य व चिघळत्या आजारांचा सामना करावा लागत आहे. (Animal Care Tips)

जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.(Animal Care Tips)

सततच्या पावसामुळे आजारांचा धोका

पावसामुळे गोठ्यात ओलावा, चिखल आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे जनावरांमध्ये मोह, घटसर्प, चौखुरा, सरा, बॅबेसिओसिस यांसारखे रोग मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. विशेषतः दुधाळ जनावरांची तब्येत आणि दूध उत्पादन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

प्रमुख आजार व लक्षणे

आजाराचे नावमुख्य लक्षणेप्रभावित जनावरे
घटसर्पगळ्याला सूज येणेगाय, म्हैस, शेळी, मेंढी
चौखुरापायांच्या खुरांना कीड लागणेसर्व पाळीव जनावरे
सराडास-माशांच्या चाव्यांमुळे तापगाय, म्हैस, घोडा, उंट
बॅबेसिओसिसपिसका चावल्याने ताप, थकवाविशेषतः संकरित दुधाळ जनावरे

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी; मार्गदर्शन

* गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण : गोठा नेहमी कोरडा ठेवावा

* पोटॅशियम परमॅग्नेट किंवा फिनाईलच्या द्रावणाने ८ ते १५ दिवसांतून स्वच्छता करावी

* साचलेले पाणी टाळावे, मलमूत्र व्यवस्थित विल्हेवाट लावावी

* चुन्याची पावडर अंथरावी

लसीकरण व औषधोपचार

* वेळेवर लसीकरण आणि कृमिनाशक औषधांचा वापर करावा

* आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

चाऱ्याचे नियोजन

* ओला, सडलेला किंवा बुरशीयुक्त चारा देणे टाळावे

* शक्यतो सुकवलेला, स्वच्छ आणि पचायला हलका चारा द्यावा

पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे नियमित लसीकरण, गोठ्याचे निर्जंतुकीकरण व चाऱ्याची योग्य व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. - डॉ. अरुण यादगिरे, पशु संवर्धन उपायुक्त विभाग

हे ही वाचा सविस्तर : Hydroponic Fodder : जनावरांना नवा आहार; आरोग्याला नवा आधार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीप्राण्यांवरील अत्याचारशेतकरीशेती