Join us

Khillari Jodi: सर्जा-राजाची जोड खिल्लारी; किंमतही मिळतेय लय भारी! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:06 IST

Khillari Jodi : खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीकडे वळले आहेत, तर दुसरीकडे बाजारही चांगलेच 'तापले' आहेत. सर्जा-राजाच्या जोडीला (Sarja-Raja's Khillari Jodi) कशी मिळतेय किंमत ते वाचा सविस्तर (Khillari Jodi)

बाबू खामकर

खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीकडे वळले आहेत, तर दुसरीकडे बाजारही चांगलेच 'तापले' आहेत. बळीराजाचा जीव की प्राण असणाऱ्या सर्जा-राजाच्या जोडीला (Sarja-Raja's Khillari Jodi) लाखांपेक्षा अधिक रक्कम मोजावली लागत आहे. (Khillari Jodi)

भूम तालुक्याचे अर्थकारण शेतीवर निर्भर आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.एकीकडे यांत्रिकीकरण वाढत असले तरी दुसरीकडे बैलांच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही काही कमी नाही. (Khillari Jodi)

मध्यंतरी पशुधनाचे बाजार पडले होते. पन्नास ते साठ हजारांत खिल्लार बैलजोडी मिळत होती, मात्र, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पशुधनाचा बाजार तापला आहेत. खरीप हंगाम तोंडावर येऊ ठेपला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी बाजारात दाखल होताहेत. (Khillari Jodi)

पाथरूड येथील बाजारात असेच काहीसे चित्र होते. मागणी वाढल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारीही बैल, गायी घेऊन येताहेत. खिल्लार बैलजोडी खरेदीस शेतकरी पसंती देत असल्याने त्यांचा दरही लाखावरच आहे.  (Khillari Jodi)

अशा बैलजोडीसाठी साधारणपणे एक लाख ते सव्वा लाखांपर्यंत रक्कम मोजावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत किमती दुप्पटीने वाढल्याचे व्यापारी, शेतकरी सांगताहेत.(Sarja-Raja's Khillari Jodi)

५० ते ६० हजारांत मिळत होती जोड...

* साधारणपणे दीड महिन्यांपूर्वी बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. मात्र, खरीप हंगामाची पेरणी अवघ्या महिनाभरावर आली आहे. त्यामुळे बाजारात पशुधनही मोठ्या संख्येने येऊ लागले आहे.

* बाहेरच्या जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या राज्यातील व्यापारी पशुधन घेऊन येताहेत. ५० ते ६० हजार रुपयांत मिळणाऱ्या बैलजोडीसाठी आता एक लाख ते सव्वा लाख रुपये मोजावे लागताहेत.

लाख रुपये मोजले, पण खिल्लार बैलजोडीच घेतली

* पाथरूड येथील शेतकरी बबन माने बैलांच्या माध्यमातून शेती कसतात. मागील तीन-चार वेळा बाजारात आले, परंतु, बैलजोडी पसंत पडली नाही. यावेळी त्यांना एक बैलजोडी पसंत पडली.

* मात्र, व्यापारी १ लाख १० हजारांच्या खाली येण्यास तयार नव्हता. मग काय, शेतकरी माने यांनी तेवढी रक्कम मोजली अन् खिल्लार बैलजोडी घरी नेली, यांच्यासोबत अन्य शेतकरऱ्यांनीही घेतलेल्या बैलजोडींची किंमत लाखाच्या घरात होती.

५० ते ६० हजारापर्यंत मिळत होती बैलजोडी

साधारपणे दीड ते दोन महिन्यांपूर्वी जनावरांच्या बाजारात ५० ते ६० हजारांत बैलजोडी मिळत होती. मात्र, आता एका बैलजोडीसाठी लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागतेय.

हे ही वाचा सविस्तर : Flower Market: ऐन लग्नसराईत फुल बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीशेतकरीशेतीबाजार