Join us

Krushi Paryatan : तुमच्या शेतात सुरु करा कृषी पर्यटन, लाखो रुपये कमविण्याची संधी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:35 IST

Krushi Paryatan : यामध्ये तुम्ही तुमची शेती करू शकता आणि तुमची शेती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लोकही येतील. 

Krushi Paryatan : अलीकडे शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसायाला प्राधान्य देऊ लागले आहेत. यामध्ये दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, शेळी, मेंढी किंवा कुक्कुटपालन आदी व्यवसाय सर्रास केले जात आहेत. अलीकडच्या वर्षात यामध्ये भर पडली आहे, ती म्हणजे कृषी पर्यटनाची. यामध्ये तुम्ही तुमची शेती करू शकता आणि तुमची शेती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लोकही येतील. 

कृषी पर्यटनासाठी, तुम्हाला तुमचे शेती अशा प्रकारे विकसित करावी लागेल की दूरदूरचे पर्यटक तिथे येऊन ग्रामीण जीवन, शेती, निसर्गाच्या सानिध्यात राहणे आणि गावातील स्थानिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतील. यामुळे तुम्हाला केवळ शेतीतूनच नव्हे तर कृषी पर्यटनातूनही पैसे मिळतील. या कामात खूप वाव आहे कारण आता शहरात राहणाऱ्या नवीन पिढीला ग्रामीण जीवन आणि वास्तविक निसर्ग अनुभवायचा आहे. यासाठी कृषी पर्यटन महत्वाचे ठरत आहे. 

कृषी पर्यटन म्हणजे शेती आणि पर्यटनाला एकत्र आणून, लोकांना शेतात किंवा ग्रामीण भागात राहण्याचा, काम करण्याचा आणि तिथल्या जीवनशैलीचा अनुभव घेण्याचा एक मार्ग आहे. यात शेती, फळबाग, डेअरी, कुक्कुटपालन अशा विविध कृषी-आधारित उद्योगांना भेटी देणे, त्यात सहभागी होणे आणि त्यातून आनंद मिळवणे यांचा समावेश होतो. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते, तसेच शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळते. 

कृषी-पर्यटन कसे सुरू करावे?सर्वात प्रथम तुमच्याकडे जमीन पाहिजे. त्यानंतर जर तुमचे शेत मुख्य रस्त्याजवळ किंवा शहराजवळ असेल तर जास्त पर्यटक येतील. तुमच्या शेतात तलाव, बाग, शेती आणि पशुपालन असे सर्व प्रकारचे नैसर्गिक वातावरण निर्माण करा. प्रथम शेतात दिवसा भेटीचा एक मॉडेल बनवा, नंतर उत्पन्न वाढल्यावर रात्रीचा मुक्काम देखील सुरू करा.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हा पर्यटन विकास महामंडळाला भेट द्या. तसेच Maharashtra Tourisam या संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त माहिती आणि अर्जही करू शकता.  

टॅग्स :पर्यटनशेती क्षेत्रकृषी योजनाशेती