lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, आहारात तृणधान्य पिकांचं महत्व

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, आहारात तृणधान्य पिकांचं महत्व

Sorghum, Bajri, Raghani, Varai, Rala, importance of cereal crops in diet | ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, आहारात तृणधान्य पिकांचं महत्व

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, आहारात तृणधान्य पिकांचं महत्व

अनेक आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.

अनेक आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारत हा जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे.  मात्र आपल्या आहारात हळूहळू तृणधान्य कमी होत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे आपल्या आहारात पौष्टीक तृणधान्य किती मह्त्वाच आहे, हे समजून घेतलं पाहिजे. 

गेल्या काही वर्षात आपल्या आहारात तृणधान्याचे प्रमाण कमी होत आहे. मात्र हळूहळू याबाबत सजगता येत असून आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या तृणधान्य आहारात समाविष्ट होत आहे.  तृणधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थ असल्यामुळे याकडे लोकं ‘सुपरफूड’ म्हणून पाहू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारखे पौष्टिक तृणधान्ये ही कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध आहेत.
             
तृणधान्यांचे महत्व 

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. हिवाळ्यामध्ये सर्दी- खोकला विविध संक्रमण विषाणूजन्य समस्यांपासून बचाव, पचन संस्था निरोगी राखण्यासाठी हिवाळ्यात बाजरीचे सेवन हितकारक, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि निरोगी राहण्यासाठी बाजरीचे सेवन गरजेचे, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरी हा एक उत्कृष्ट पर्याय, संक्रात भोगी सणाला बाजरी भाकरीला पारंपारिक महत्त्व, हिमोग्लोबिन स्तर वाढवण्याकरता बाजरी उपयुक्त.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते. नाचणी पिकाचे महत्त्व शक्तीवर्धक पित्त नशामक असल्याने रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त, ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी लाभदायक, कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयस्कर व्यक्तींना हाडासाठी व ऍनिमियांवर नाचणीचे पदार्थ खाणे फायदेशीर, लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त, नाचणी मधुमेह रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करते, नवजात शिशु आणि स्त्रियांकरता नाचणी सत्व अतिशय उपयुक्त ठरते.

राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते.

राजगिरा : राजगिरा शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने सुपर फूड म्हणून प्रचलित, राजगिरा लुटेन, फ्री फायबर्स नियुक्त आहे, त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, विटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा केस व हिरड्याच्या विकारांवर उपयुक्त, स्तनदा मातांसाठी दुग्ध वाढीकरता राजगिरा उपयुक्त, राजगिऱ्यांमधील  रक्तस्तंभक गुणधर्म हा रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतो.


तृणधान्य उत्पादनामुळे शेतकऱ्यांना लाभ

तृणधान्य पिके ही कमी गुंतवणुकीत घेता येतात. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांना पाणी कमी लागते तसेच ती वातावरणाचा ताण सहन करू शकतात. तृणधान्य पिकांची वेगाने वाढ होते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांबाबत कीड-रोग समस्या फारशा नाहीत. कमी क्षेत्रातही ही पिके यशस्वीरित्या घेतली जावू शकतात. स्वास्थ्य आहारासोबतच जनावरांना चाराही पुरवतात. कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नास पौष्टिक तृणधान्य पिके पूरक आहेत. भविष्यातील कल पाहता सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यासाठी तसेच शेतकरीवर्गाला आर्थीक उत्पन्न वाढीसाठी तृणधान्य पिके फायदेशीर ठरणार आहेत.

Web Title: Sorghum, Bajri, Raghani, Varai, Rala, importance of cereal crops in diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.