Join us

Jwari Kadhani Yantra : फुले ज्वारी काढणी यंत्राची किमया न्यारी, कमी कष्टात उत्पादन भारी, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:51 IST

Jwari Kadhani Yantra : महात्मा फुले विद्यापीठाने पुढाकार घेऊन मानवचलित फुले ज्वारी काढणी (Jwari Kadhani) उपकरण विकसित केले आहे.

Jwari Kadhani Yantra :  शेतकऱ्यांचे कष्ट दूर करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नेहमी महत्त्वाची भूमिका वठविलेली आहे. ज्वारीचे ताट काढण्यासाठीही विद्यापीठाने पुढाकार घेऊन मानवचलित फुले ज्वारी काढणी (Jwari Kadhani) उपकरण विकसित केले आहे. फुले ज्वारी काढणी यंत्र हे मानवचलित यंत्र आहे. या यंत्राच्या साहाय्याने बागायती आणि कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढता येते. 

हाताने ज्वारी मुळासहित उपटण्यापेक्षा कमी कष्टात ज्वारी काढता येते, वजनाला हलके असल्याने उचलून नेण्यासाठी सोपे, वापरासाठी सुलभ, बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त आहे. तर जाणून घेऊयात या यंत्राबद्दल... 

ज्वारीचे पीक जातीपरीत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठीपक्याचे लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजारे फुले ज्वारी काढणी यंत्राने करावी. तसेच ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी.

  • धान्य उफणनी करून तयार झाल्यानंतर, त्याला साठवणुकीपूर्वी पुन्हा उन्हात वाळवावे. 
  • साधारणतपणे ५० किलोची पोती भरून ठेवल्यास, पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते.
  • हाताने ज्वारी मुळासह उपटणे कष्टदायक असते. 
  • तुलनेने कमी कष्टात ज्वारी काढता येते. 
  • बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त. 
  • ज्वारीच्या ताटाची जाडी कितीही जास्त असली तरी या यंत्राद्वारे सहज शक्य होते.
  • वजनाला हलके (२.१ किलो) असल्याने उचलून नेणे सोपे व वापरासाठी सुलभ
  • यंत्राची कार्यक्षमता ८ ते १० गुंठे ज्वारीची ताटे प्रति दिन

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी  

टॅग्स :ज्वारीशेती क्षेत्रशेतीकृषी योजना