Join us

Farmer Success Story : कोरफडीच्या पानातून यशाची फुले; दांडे परिवाराचा नवा यशस्वी मार्ग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:13 IST

Farmer Success Story : कोरफड (aloevera) या औषधी वनस्पतीतून गृहोद्योगाला चालना देत दांडे कुटुंबीयांनी वसमत तालुक्याचे नाव उंचावले आहे. सातत्य, मेहनत आणि नव्या पद्धतींमुळे त्यांनी केवळ स्वतःचा गाडा रुळावर आणला नाही, तर अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या या उपक्रमातून आज ग्रामीण भागात स्वावलंबनाचा नवा आदर्श घालून दिला जात आहे. (Farmer Success Story)

इस्माईल जहागीरदार

पारंपरिक शेतीला पर्याय शोधत दांडे कुटुंबीयांनी सात वर्षांपूर्वी कोरफडीच्या (aloevera)  शेतीला सुरुवात केली. आज या औषधी शेतीतून त्यांनी औषधोपचार व सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय उभारून महिलांसाठी रोजगाराची नवी दारे उघडली आहेत. या उपक्रमामुळे वसमतचे नाव राज्यभर गाजत आहे. (Farmer Success Story)

वसमत तालुक्यातील दांडे कुटुंबीयांनी पारंपरिक शेतीला फाटा देत कोरफडीच्या (aloevera)  शेतीतून एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. (Farmer Success Story)

कोरफड (aloevera)  या औषधी वनस्पतीतून औषधे व सौंदर्यप्रसाधने तयार करून त्यांनी केवळ स्वतःचा आर्थिक गाडाच रुळावर आणला नाही, तर अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे वसमत तालुक्याचे नाव उंचावले आहे.(Farmer Success Story)

सात वर्षांचा संघर्ष आणि यश

गेल्या सात वर्षांपासून दांडे कुटुंबीय कोरफडची शेती करत आहेत. सुरुवातीला हा उपक्रम धाडसाने सुरू केला असला तरी सातत्य, मेहनत आणि नव्या तंत्रज्ञानामुळे त्यात हळूहळू यश मिळत गेले. पारंपरिक पिकांच्या तोट्यातून बाहेर येण्यासाठी कोरफड लागवडीचा निर्णय घेतल्याचे दांडे कुटुंब सांगते.

कोरफडपासून घरगुती उत्पादने

फक्त शेतीवर न थांबता त्यांनी कोरफडीच्या पानांपासून विविध नैसर्गिक उत्पादने तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. 

आज त्यांनी कोरफडीचा रस, कोरफड जेल, औषधी गोळ्या, नैसर्गिक साबण, सौंदर्यप्रसाधने अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांची बाजारपेठेत चांगली मागणी असून नैसर्गिक व रसायनमुक्त असल्याने ग्राहकांचा प्रतिसादही वाढला आहे.

महिलांना रोजगाराचा आधार

या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असल्याने दांडे कुटुंबीयांनी स्थानिक महिला-पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. योग्य मोबदल्यामुळे महिला गृहोद्योगाशी जोडल्या गेल्या असून स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे.

औषधी गुणधर्म 

कोरफड ही औषधी वनस्पती डोळ्यांचे आजार, अम्लपित्त, पोटदुखी, उष्णता, केसगळती अशा अनेक समस्यांवर उपयुक्त आहे. 

प्रेरणादायी यश

आज दांडे कुटुंबीयांनी कोरफड शेती आणि उत्पादन व्यवसायातून वसमतला नवी ओळख  दिली आहे. शेतकऱ्यांनी नव्या पद्धती स्वीकारल्यास शेतीतूनही यश व नाव मिळवता येते, हे त्यांनी आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे.

कोरफड शेती करावी 

कोरफड ही वनौषधी असून, डोळ्यांचे आजार, अम्लपित्त, पोटदुखी, उष्णता, केस गळणे, टकलेवर केस येणे आदींसाठी उपयुक्त आहे. इतर शेतकऱ्यांनी कोरफड शेती करावी, याबाबत मार्गदर्शन केले. कोरफड शेती करण्यासाठी माझे पती अशोक दांडे हेही मला सहकार्य करतात. - वनिता अशोक दांडे, उद्योजिका

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : टोमॅटोचं लाल सोनं; ३० गुंठ्यातून वाबळे बंधूंनी कमावले लाखो! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिला