Join us

Mirchi Pickle : थंडीमध्ये घरच्या घरी बनवा लिंबू- मिरचीचे चविष्ट लोणचे, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:47 IST

Mirchi Pickle : विद्यार्थ्यांना लिंबू व हिरवी मिरची (Green Chilly) यांचे मिश्र लोणचे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Mirchi Pickle : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) रांजणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालयात शेतमाल प्रक्रिया उद्योग तसेच शेतीपूरक स्वयंरोजगार अंतर्गत विद्यार्थ्यांना लिंबू व हिरवी मिरची (Green Chilly) यांचे मिश्र लोणचे तयार करण्याविषयी प्राचार्य प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनात संगीता वसावे यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. 

यात लिंबू व हिरवी मिरची यांचे मिश्र लोणचे (Mix Pickle) तयार करण्यासाठी ७५० ग्रॅम लिंबू व २५० ग्रॅम हिरवी मिरची वापरावी. हे प्रमाण चवीनुसार व आवडीनुसार कमी जास्त करावे. लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, पिवळसर रंगाची व मोठ्या आकाराची फळे निवडावीत. तसेच मिरची चांगल्या प्रतीची असावी. 

घटक पदार्थाचे प्रमाण लिंबू ७५० ग्रॅम, हिरवी मिरची २५० ग्रॅम, मीठ २५० ग्रॅम, हळद पावडर ५ ग्रॅम, मेथ्या १० ग्रॅम, मोहरी डाळ ५० ग्रॅम, हिंग पावडर २५ ग्रॅम, तेल २०० ते २५० मि.लि. 

कृती कशी करावी? 

  1. सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवुन पुर्ण कोरड्या करुन मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. 
  2. तसेच २ लिंबाच्या ८ फोडी करुन घ्या. 
  3. मोहोरीची डाळ किंचीत गरम करुन घ्यायची, म्हणजे काही दमटपणा असेल तर जातो. 
  4. गॅस बंद करुन त्यात मेथी पावडर घालुन एकत्र मिश्रण करायचे. 
  5. मिरचीचे तुकडे, लिंबाच्या फोडी एकत्र करुन मिठ घालुन अगदी ५ मिनीटे ठेवायचे.
  6. त्यात वरील मसाला एकत्र करुन मिसळुन घ्यायचे. 
  7. यानंतर १ चमचा हळद घालायची.
  8. दोन लिंबाचा रस काढुन घेऊन तो मिश्रणात टाकायचा.
  9. त्यानंतर थंड झालेली फोडणी घालायची.
  10. अशा पद्धतीने थंडीमध्ये लिंबू मिरचीचे लोणचं बनवता येईल . 

 

Ration Card Update : तुम्हाला रेशनकार्डवरील नाव कमी करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

 

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीशेतीकृषी योजना