Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदा टिकविण्यासाठी लासलगावी विकिरण प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2023 15:57 IST

आजतागायत ७०० मे.टन कांद्यावर प्रक्रिया . शहापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये होतेय साठवणूक

भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यास चांगल्या प्रतीचा कांदा ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या कांद्यावर विकिरण प्रक्रिया करून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रात प्रायोगिक तत्वावर आतापर्यंत सातशे मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येऊन तो शहापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जात आहे.

विभागाने खरेदी केलेल्या चार हजार मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करून तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काम सुरू झाले आहे. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रात आतापर्यंत सातशे मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली असून तो शहापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जात आहे. त्यानंतर नाशिक येथील शीत प्रकल्पात तो साठविला जातो.

विकिरण प्रक्रिया म्हणजे?लासलगावच्या भाभा अणू संशोधन केंद्रात गॅमा किरणांचा ६० ते ९० ग्रे मात्रा विकिरण मारा केल्याने बदलत्या वातावरणामुळे कांद्याला येऊ पाहणारे कोंब येत नाहीत. त्यामुळे कांदा खराब होत नाही आणि कांदा चांगला राहण्यास मदत होते.जाणार आहे. लासलगाव येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोल्ड स्टोरेजचे काम प्रगतिपथावर आहे. भाभा अणू संशोधन केंद्राची निर्मिती कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी झाली आहे..

कांदा विकिरणाचे फायदे

  • दीर्घ साठवणुकीमधील कांद्याचे नुकसान नियंत्रित करण्याचा उद्देश.
  • राज्यामधील प्रमुख कांदा उत्पादन केंद्रावर विकीरण सुविधा प्रस्थापित करणे.
  • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था किंवा खाजगी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी.
  • भाभा ॲटॉमीक रिसर्च सेंटरने विकसीत केलेल्या विकीरण तंत्रज्ञानाचा अवलंब.
  • कांद्याच्या सुगी पश्चात होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण केल्याने आर्थिक फायदा.
टॅग्स :कांदामार्केट यार्ड