मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:55 PM2024-05-15T16:55:46+5:302024-05-15T16:59:10+5:30

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले आहे.

Lok Sabha Elections 2024 Brijbhushan Sharan Singh said that Muslims and our DNA are the same | मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

Lok Sabha Elections 2024 : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले. भाजपने ब्रिजभूषण यांचा मुलगा करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट दिले आहे. आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी ब्रिजभूषण यांनी कंबर कसली असून, ते प्रचारात व्यग्र आहेत. विविध सभांच्या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेले ब्रिजभूषण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

एका सभेला संबोधित करताना ब्रिजभूषण यांनी एका वर्षांपासून माझ्याविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. माझ्या शरीरावर एवढे हल्ले झाले आहेत की, माझे शरीर दगडाचे झाले आहे. पण मी अजिबात शांत राहू शकत नाही. त्यांनी मुस्लिमांना अनुसरून सांगितले की, कोणी म्हणू अथवा नको पण तुमचे आणि माझे रक्त एक आहे. आपला डीएनए एकच आहे. जर आपला डीएनए तपासला तर तो सारखाच असेल. यावेळी ब्रिजभूषण खूप भावूक दिसले.

ब्रिजभूषण शरण सिंह भावूक  
तसेच ६०० किमी दूर असलेल्या हरयाणात बसलेले काही चेहरे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यांना माझे राजकीय भविष्य अंधारात आणायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मतांच्या माध्यमातून त्यांना चोख प्रत्युत्तर द्या. १९९६ मध्ये देखील यापद्धतीचे षडयंत्र रचण्यात आले होते आणि आता देखील हे होत आहे. एका वडिलांसाठी आपला मुलगा खासदार व्हावा यापेक्षा कोणती मोठी बाब नाही. माझ्या मुलाचे वय ३३ वर्ष असून मी देखील ३३ व्या वर्षी खासदार झालो होतो, असेही ब्रिजभूषण यांनी सांगितले. 

दरम्यान, कैसरगंज लोकसभा मतदारसंघात गोंडा, तारबगंज, कर्नलगंज, कटरा या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज आणि पायगपूर या दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार देखील कैसरगंजचा खासदार ठरवतात. २००९ मध्ये समाजवादी पक्षाकडून ब्रिजभूषण निवडून आले. त्यानंतर ते २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर विजयी झाले.

Web Title: Lok Sabha Elections 2024 Brijbhushan Sharan Singh said that Muslims and our DNA are the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.