वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 02:54 PM2024-05-13T14:54:15+5:302024-05-13T14:55:45+5:30

उमेदवारी मिळूनही स्वतः वसंत मोरे यांना पुणे लोकसभेसाठी मतदान करता आले नाही

Deprived candidates themselves deprived for Pune Lok Sabha constituency Right exercised in Shirur Constituency | वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क

वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क

संतोष गाजरे 

कात्रज : आज पुणे लोकसभा मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षाकडून  जोरदार तयारी करण्यात आली. वंचित कडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी  पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु असे असताना स्वतः वसंत मोरे यांना मात्र पुणे लोकसभेसाठी स्वतःला मतदान करता आले नाही.

वसंत मोरे हे कात्रजला वास्तव्यास असल्याने शिरूर मतदार संघात त्यांचे मतदान असल्याने त्यांनी कृष्णाजी मोरे विद्यालयात शिरूर साठी मतदानाचा हक्क बजावला. वसंत मोरे यांनी अनेक वर्षापासून असलेल्या मनसे पक्षाला रामराम ठोकला. लोकसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी देखील घेतल्या होत्या अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित कडून त्यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांना स्वतःलाच पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान करता न आल्याने वंचितचे उमेदवार स्वतःच लोकसभेसाठी वंचित असल्याचे पाहायले मिळाले.

मी कात्रज येथे राहायला असल्याने माझे मतदान शिरूर लोकसभेला आहे. मी कृष्णाजी मोरे शाळेत मतदानाचा हक्क बजावला.- वसंत मोरे, उमेदवार पुणे लोकसभा मतदार संघ.

Web Title: Deprived candidates themselves deprived for Pune Lok Sabha constituency Right exercised in Shirur Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.