KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:02 AM2024-05-03T11:02:44+5:302024-05-03T11:03:59+5:30

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा (KL Sharma) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

who is amethi congress candidate kl sharma Lok Sabha Election 2024  | KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?

KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?

KL Sharma : लखनौ : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसच्या उमेदवारीवरून चर्चेत होत्या. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली पत्ते उघड केले आहेत. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा (KL Sharma) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही नावांची यादी आज काँग्रेसने जाहीर केली आहे.

दरम्यान, अमेठीतून केएल शर्मा यांच्या नावाची घोषणा होताच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. केएल शर्मा भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. केएल शर्मा हे गांधी कुटुंबाचे जवळचे आहेत. तसेच, रायबरेलीमध्ये केएल शर्मा यांनी दीर्घकाळ सोनिया गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते. जेव्हा जेव्हा गांधी घराण्याशी संबंधित बाबींचा विचार केला जातो, तेव्हा केएल शर्मा हे रायबरेली आणि अमेठीमधील पॉइंट पर्सन असतात, म्हणजेच पक्षातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती. 

केएल शर्मा हे मूळचे पंजाब राज्यातील आहेत. 1983 मध्ये ते पहिल्यांदा अमेठीत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आले होते. काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान (दिवंगत) राजीव गांधी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध राहिले. अमेठीमध्ये राहून केएल शर्मा यांनी पक्षासाठी कठोर मेहनत घेतली. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या निधनानंतरही ते अमेठीमध्ये काँग्रेसला मजबूत करण्याचे काम करत राहिले. त्यांनी काँग्रेसच्या इतर उमेदवारांचा प्रचार सुरू ठेवला. 1999 मध्ये सोनिया गांधींच्या पहिल्या निवडणूक प्रचारात केएल शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

Web Title: who is amethi congress candidate kl sharma Lok Sabha Election 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.