सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:27 AM2024-05-18T05:27:12+5:302024-05-18T05:28:05+5:30

बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना साथ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या सभेत केले. 

true shiv sainik will not vote for congress said eknath shinde in shivaji park rally for lok sabha election 2024 | सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे

सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपला जीव गेला तरी सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही. उबाठाकडे शिव्यासेना आहे, आमच्याकडे खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना साथ देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या सभेत केले. 

शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोडे मारले होते. उद्धव हे आज त्याच काँग्रेसवाल्यांना डोक्यावर घेत आहेत. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला ते आता कचरतात. ज्या बाळासाहेबांचा मताधिकार काँग्रेसने सहा वर्षांसाठी काढून टाकला, त्या काँग्रेसला उद्धव मत देत आहेत. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले, पोराने चुकीचा रस्ता पकडला, हे तुम्हाला चालेल का? असा सवालही शिंदे यांनी केला.

मोदींशिवाय कुणीही देश चालवू शकत नाही 

काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ है, हे लोकांना माहिती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानची वाकड्या नजरेने भारताकडे पाहण्याची हिंमत झाली नाही. दहा वर्षांत एकही अतिरेकी हल्ला झाला नाही, कारण त्यांना माहिती आहे की काही केलेच तर मोदी घर मे घुसकर मारेंगा. मोदी गया तो गुजरात गया असे बाळासाहेब म्हणाल्याची आठवण शिंदेंनी काढली.
 

Web Title: true shiv sainik will not vote for congress said eknath shinde in shivaji park rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.