लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसपेक्षा आपचे काम जास्त, अमित पालेकर यांचा दावा

By पूजा प्रभूगावकर | Published: May 11, 2024 03:43 PM2024-05-11T15:43:05+5:302024-05-11T15:43:34+5:30

Goa Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीसाठी गोव्यात इंडिया आघाडीतर्फे कॉंग्रेसपेक्षा जास्त काम आमआदमी पक्षानेच (आप) जास्त केले आहे. आता हे असे का ? हे त्यांनाच विचारावे असे पक्षाचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Goa Lok Sabha Election 2024: Amit Palekar claims that Amit Palekar has more work to do than Congress in Goa for the Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसपेक्षा आपचे काम जास्त, अमित पालेकर यांचा दावा

लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसपेक्षा आपचे काम जास्त, अमित पालेकर यांचा दावा

पणजी -  लोकसभा निवडणूकीसाठी गोव्यात इंडिया आघाडीतर्फे कॉंग्रेसपेक्षा जास्त काम आमआदमी पक्षानेच (आप) जास्त केले आहे. आता हे असे का ? हे त्यांनाच विचारावे असे पक्षाचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कॉंग्रेस हा मोठा पक्ष आहे. निवडणूकीत कॉंग्रेसनेही इंडिया आघाडीच्या दोन्ही उमेदवारांसाठी काम केले. मात्र आप च्या तुलनेत हे काम कमीच आहे. मतदारांपर्यंत आम्ही जास्त पोहचलो असे म्हणणे योग्य ठरेल. इंडिया आघाडीचे दाेन्ही उमेदवार निवडणूकीत जिंकणार असा आमचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

पालेकर म्हणाले, की अटकेत असलेले आपचे नेता तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी जामीन दिला. लोकशाहीचा हा विजय आहे. केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने दिल्लीत दिवाळी साजरी करण्यात आली. भाजप सरकार केजरीवाल यांना घाबरते , त्यातूनच त्यांच्यावर ही कारवाई झाल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Goa Lok Sabha Election 2024: Amit Palekar claims that Amit Palekar has more work to do than Congress in Goa for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.