...तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू केली होती, राधाकृष्ण विखेंचा दावा

By अण्णा नवथर | Published: May 5, 2024 11:51 AM2024-05-05T11:51:13+5:302024-05-05T11:56:32+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: बाळासाहेब थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त्यांनी करावा असे आव्हान मंत्री विखे यांनी थोरात यांना केले आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: ...then Balasaheb Thorat had started the process of joining BJP, claims Radhakrishna Vikhe | ...तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू केली होती, राधाकृष्ण विखेंचा दावा

...तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू केली होती, राधाकृष्ण विखेंचा दावा

- अण्णा नवथर  
अहमदनगर - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता -पुत्र काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय खळबळ उडाली असून विखे व थोरात यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. बाळासाहेब थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त्यांनी करावा असे आव्हान मंत्री विखे यांनी थोरात यांना केले आहे.

वंचितचे नेते आंबेडकर यांच्या वक्तव्याबाबत माध्यमांशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विखे यांची काँग्रेसमध्ये येण्यासाठीची धडपड सुरू आहे. हे माझ्याही कानावर आले आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना सत्ता कुणाची येणार आहे, हे सर्वांपेक्षा लवकर कळते.  थोरात यांच्या या टीकेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,  सध्या लोकसभा च्या निवडणुका सुरू आहेत. देशातील कोणत्याही मुद्द्यावर ते बोलायला तयार नाहीत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त्यांनी करावा असे आव्हान मंत्री विखे यांनी थोरात यांना केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खेडकर यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नगरमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी विखे यांच्यावर तोफ डागली. त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत,असा गोप्यस्फोट केला. त्यावरून थोरात व विखे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे यांची काँग्रेसमध्ये येण्याची धडपड सुरू असल्याची कुणकुण आपल्या कानावर आली आहे, असे सांगितले,  तर दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती का थांबली याचा खुलासा त्यांनी करावा, अशी टीका केली आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: ...then Balasaheb Thorat had started the process of joining BJP, claims Radhakrishna Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.