Sambhajiraje: ... म्हणून संभाजीराजेंनी पत्नी संयोगीताराजेंनाही ज्यूस पाजला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:48 PM2022-02-28T20:48:17+5:302022-02-28T21:08:20+5:30

Sambhajiraje: मराठा समाजातील नेते आणि मुख्यमंत्री सन्माननीय ना.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रलंबित मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून त्यातील बहुतांश मागण्या कालबद्ध कार्यक्रम ठरवून मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात प्राणांतिक उपोषणाला बसलेले खासदार आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले.

महाविकास आघाडीतील सहकारी असलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह भेट घेऊन मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवत त्यांनी उपोषण मागे घेण्यास अनुमती देऊन ते मागे घेतले.

मराठा समाजातील नेते आणि मुख्यमंत्री सन्माननीय ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रलंबित मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून त्यातील बहुतांश मागण्या कालबद्ध कार्यक्रम ठरवून मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले.

संभाजीराजेंच्या या उपोषणास महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळाला, तसेच घरातूनही त्यांना पाठिंबा होता. त्यांच्या पत्नी संयोगिताराजे याही तीन दिवस आझाद मैदानावरच होत्या.

विशेष म्हणजे संयोगिता राजेंनीही जाहीरपणे न येता, पती संभाजीराजेंच्या उपोषणासा समर्थन दर्शवत अन्नत्याग केला होता. त्यामुळेच, संभाजीराजेंनी ज्यूस घेतल्यानंतर पत्नी संयोगिताराजेंचंही उपोषण आपल्या हाताने सोडलं

संयोगिता राजे याही गेल्या 3 दिवसांपासून संभाजीराजेंच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या केवळ सहभागी झाल्या नव्हत्या, तर त्यांनीही अन्नत्याग केला होता. याबाबत स्वत: संभाजीराजेंनीच सांगितलं.

तुम्ही माझी ताकद आहात, त्यामुळे तुम्ही काहीतरी खावा, असं मी त्यांना सांगायचो. त्यावेळी, त्या म्हणत मी थोडंस सूप घेतलंय. मात्र, मला त्या थापा मारत आल्यात, असे संभाजीराजे म्हणाले.

संयोगिताराजेंनीही अन्नत्याग केला, इथं येऊन काम केलं. त्यामुळेच, माझ्यापेक्षाही त्यांचं जास्त योगदान आहे, असे संभाजीराजेंनी म्हटलं. यावेळी, मी आजपर्यंत पहिल्यांदाच त्यांना थाप मारली, असे संयोगिताराजेंनी सांगितलं.

दरम्यान, सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. प्रामुख्याने सारथी संस्थेअंतर्गत मराठा समाजातील तरुणांना शिकवण्यात येणाऱ्या कोर्सेसमध्ये वाढ करून महिन्याभरात ते सुरू करणे, संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे, सारथी संस्थेतील सर्व रिक्त पदे १५ मार्चच्या आधी भरणे,

संस्थेची ८ उपकेंद्र १५ मार्चच्या आत सुरु करणे तसेच या संस्थेसाठी पुरवणी मागण्यांद्वारे अतिरिक्त १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संस्थेकडून देण्यात आलेल्या कर्जाच्या व्याज परताव्याबाबत आणि क्रेडिट गॅरंटी याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.