मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:07 AM2024-03-19T10:07:53+5:302024-03-19T10:08:44+5:30

मुंबई उपनगरात ५ टक्केच नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे. 

youth turn their backs on voter registration only 5 percent enrollment in 18 to 19 age group in mumbai | मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी

मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी

मुंबई : सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उपनगर जिल्ह्यात नवीन मतदारांनी पुढे येत वेळेत मतदार नोंदणी करावी, यासाठी शासनाने विविध पातळीवर पैसा खर्च करत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविले आहेत. मात्र, अनेक प्रयत्न करूनही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवीन मतदारांचा हवा तसा उत्साह नाही. परिणामी, १८- १९ वयोगटातील मतदारांची ३ टक्के, अशी टक्केवारीसुद्धा निवडणूक विभागाला गाठता आलेली नाही. 

त्यामुळे उपनगरात ५ टक्केच नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे. 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. आचारसंहिता लागल्यापासून मुंबईतील पोस्टर्स, होर्डिंग्जवरील कारवाई करत १२ हजार २९० बॅनर्स, कटआऊट्स काढण्यात आलेले आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी विविध नियंत्रण कक्ष स्थापन केले गेले 
आहेत. या नियंत्रक कक्षातून राजकीय पक्षाचा प्रचार आणि जाहिरातबाजी यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी २२४ जणांचे पथक कार्यरत आहे. वयाची १०० पार केलेले ४६३४ मतदार आजघडीला आहेत. निवडणुकीसाठी ४४ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.

वयाची शंभरी पार केलेले ४ हजार मतदार! 

उपनगरात ४ लोकसभा मतदारसंघात एकूण ७२ लाख २८ हजार ४०३ मतदार आहेत. त्यात १४,११३ दिव्यांग मतदार आहेत. वयाची ८५ पार केलेले १,०१,६७३ मतदार आहेत, तर १,६४४ परदेशी मतदार आहेत. या सर्वांसाठी ७ हजार ३५३ मतदार केंद्र आहेत. त्यापैकी १७  केंद्र सोसायटीत उभारली आहेत.शिवाय वयाची १०० पार केलेले ४६३४ मतदार आजघडीला आहेत. निवडणुकीसाठी ४४ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.

नवमतदार नोंदणी  -

ज्याप्रमाणे अपेक्षित आहे तसा प्रतिसाद नवीन मतदारांकडून आलेला नाही. तो अजूनही कमी आहे. १८- १९ वयोगटातील मतदारांची ३ टक्के, अशी आदर्श टक्केवारी आहे. मात्र, उपनगरात पूर्णांक ५ टक्के एवढी कमी नवमतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे ५५ हजार एवढेच नव मतदार उपनगरात असल्याचे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: youth turn their backs on voter registration only 5 percent enrollment in 18 to 19 age group in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.