हजसाठी यंदा राज्यातून ११ हजारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:04 AM2018-01-12T02:04:57+5:302018-01-12T02:05:07+5:30

इस्लाम धर्मात महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या हज यात्रेसाठी यंदा राज्यातील ११ हजार ५२७ जणांना संधी मिळाली आहे. गतवर्षापेक्षा ही संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. हज यात्रेसाठीचे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले.

This year 11 thousand opportunities for Haj from the state | हजसाठी यंदा राज्यातून ११ हजारांना संधी

हजसाठी यंदा राज्यातून ११ हजारांना संधी

Next

मुंबई : इस्लाम धर्मात महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या हज यात्रेसाठी यंदा राज्यातील ११ हजार ५२७ जणांना संधी मिळाली आहे. गतवर्षापेक्षा ही संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. हज यात्रेसाठीचे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले. महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे हज यात्रा-२०१८साठी संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरूची निवड करण्यात आली. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.
ए. खान, राज्य समितीचे इम्तियाज काझी उपस्थित होते. या वेळी सातत्याने तीन वर्षे अर्ज करूनही सोडतीमध्ये संधी न मिळालेल्यांना चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी पूर्ववत सुरू करावी, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली. इम्तियाज काझी यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

Web Title: This year 11 thousand opportunities for Haj from the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई